मुंबईत गोवरचा १२वा बळी; रुग्णसंख्या २३३ वर

मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरात गोवरने हळूहळू अमिबासारखे हातपाय पसरले आहेत. या गोवरचे कालपर्यन्त गोवरचे ११ बळी गेले होते. मात्र गेल्या २४ तासात १२ बळी घेतला आहे.

measles

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरात गोवरने हळूहळू अमिबासारखे हातपाय पसरले आहेत. या गोवरचे कालपर्यन्त गोवरचे ११ बळी गेले होते. मात्र गेल्या २४ तासात १२ बळी घेतला आहे. भिवंडी (ठाणे) येघील एका आठ महिन्यांच्या मुलाचा गोवरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (12th measles victim in Mumbai Number of patients at 233)

दरम्यान, गोवरचे आणखीन १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता गोवरची रुग्णसंख्या २३३ वर गेली आहे. मुंबई महापालिकेसह ठाणे, भिवंडी प्रशासनही गोवरला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कडक उपाययोजना करण्यासाठी चांगलेच कामाला लागले आहे.

भिवंडी येथील ज्या आठ महिन्यांच्या मुलाचा गोवरमुळे मृत्यू झाला त्याच्या वैद्यकीय अहवालातील माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तर आणखीन दोन दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी त्याच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आली होती. त्याचे लसीकरण पूर्ण झाले नव्हते. मात्र पालिका रुग्णालयात उपचार चालू असताना अखेर नियतीने २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता बळी घेतला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर भिवंडी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कुलाबा – ३, ग्रँट रोड – १, घाटकोपर -१, मालाड – २, भांडुप – ३, वडाळा -१, दहिसर – २ असे गोवरचे १३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पालिका आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, सध्या विविध रुग्णालयात गोवर उपचारासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या ३७० बेडपैकी ११३ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये, २६ रुग्ण हे ऑक्सिजनवर आणि ५ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे २ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच, संशयित रुग्णांची संख्या ३ हजार ५३४ झाली असून पालिकेच्या आरोग्य पथकाने गोवर बाधित विभागातील ३५ लाख ७३ हजार ९७६ घरांचे सर्वेक्षण केले आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या प्रयोग शाळेस राष्ट्रीय मानांकन