घरमुंबईमध्य रेल्वे उभारणार नवीन १३ पार्किंग स्थळे

मध्य रेल्वे उभारणार नवीन १३ पार्किंग स्थळे

Subscribe

प्रवाशांची आर्थिक पिळवणूक थांबणार

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहेत. रेल्वे प्रवाशांना, त्यांचे खाजगी वाहन पार्क करताना येणार्‍या अडचणी आता दूर होणार आहेत. मध्य रेल्वेकडून 13 रेल्वे स्थानकांच्याजवळ नवीन पार्किंग स्थळे उभारण्यात येणार आहेत. त्यात 25 हजारांपेक्षा जास्त वाहने पार्क केली जाऊ शकणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेकडून निविदासुध्दा मागविण्यात आली आहे.त्यामुळे प्रवांशाबरोबर मध्य रेल्वेला तिजोरी मोठ्या प्रमाणात महसूल जमा होणार आहेत.

मुंबईतील पार्किंगची जटील समस्या सोडविण्यासाठी सक्षम पार्किंग स्थळे उभी करणे आवश्यक आहेत. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेसोबतच आता रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

मुंबईचा विस्तार आणि गर्दीही वाढली आहे. साधारणत: रेल्वे स्थानकांपासून दहा ते पंधरा मिनिटांपर्यंतच असलेली लोकवस्ती आता वाहनाने ३० ते ४५ मिनिटांच्या प्रवास करू लागण्या इतकी लांब गेली आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर आपली बाईक, कार घेऊन रेल्वे स्थानकापर्यंत येतात. मात्र अनेक रेल्वे स्थानकांबाहेर वाहन पार्क करण्यासाठी पार्किंग स्थळ नसल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच गैरसोय होते. तसेच खाजगी पार्किंग स्थळांवर अव्वाच्या-सव्वा पैसे उखळले जात असल्यामुळे नेहमी तेथे हातघाईची परिस्थिती असते.

हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आपल्या १३ रेल्वे स्थानकांबाहेर पार्किंग स्थळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात साल 2018 मध्ये 36 पार्किंग स्थळे उभारण्यात आली आहेत. त्यातून मध्य रेल्वेला एकूण 4.36 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता त्यात १३ नव्या पार्किंग स्थळांची भर पडणार आहे. 28 जूनला या 13 नवीन पार्किंग स्थळांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, कल्याण मध्य रेल्वेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग केल्याचे निर्देशनात आले होते. त्यामुळे रेल्वेने अशा ठिकाणी कायदेशीर पार्किंग स्थळे उभारली आहेत. तसेच ठाण्यात 1700 चौरसमीटर जागेत मोठे पार्किंग स्थळही उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

याठिकाणी होणार नवीन पार्किंग स्थळे
सीएसएमटी प्लॉटफॉर्म 18-1
एलटीटी जुनी इमारत -1
वांगणी रेल्वे स्थानक -1
अंबरनाथ रेल्वे स्थानक -1
कल्याण रेल्वे स्थानक -3
भांडूप रेल्वे स्थानक-1
डोंबिवली रेल्वे स्थानक -1
इगतपुरी रेल्वे स्थांनक- 1
वाशी रेल्वे स्थानक -1
निरजे रेल्वे स्थानक- 1
ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम – 1

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -