घरमुंबईमुख्यमंत्र्यांना  १३ हजारांचा दंड, वाहतूक नियम मोडले

मुख्यमंत्र्यांना  १३ हजारांचा दंड, वाहतूक नियम मोडले

Subscribe

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याने वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-चलन पाठवून १३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याने वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-चलन पाठवून १३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.  मात्र त्यांच्याकडून अद्याप हा दंड भरला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुंबई शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा, स्पीड कॅमेरा बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणी जरी, सिग्नल तोडणे, लाईन कट करणे, वेगात गाडी चालवणे, असे वाहतुकीचे नियम तोडले तरी त्याची गाडी कॅमेरात कैद होते. मग त्या गाडीच्या नंबरवरून तिच्या मालकाला  ई-चलनद्वारे दंड आकारण्यात येतो.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीने जानेवारी २०१८ ते १२ ऑगस्ट २०१८ दरम्यान तब्बल १३ वेळा वाहतूक नियम मोडल्याचे समोर आले.  वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या एमएच -०१-सीपी -००३७ आणि एमएच -०१-सीपी -००३८ या वाहनांवर दंड आकारण्यात आला. ही दंडाची रक्कम १३ हजार रुपये असून अद्याप ती भरलेली नाही.
शकील अहमद शेख या आरटीआय कार्यकर्त्याने वाहतूक पोलिसांच्या एमटीपी अ‍ॅप्समध्ये व्हीआयपींच्या वाहनांचा क्रमांक टाकून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या व्यक्तींची यादी तयार केली. तसेच त्यांनी दंड भरला की नाही याचीही माहिती मिळवली. त्यानुसार, वाहतुकीचे नियम मोडून दंड न भरणार्‍यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि अभिनेता सलमान खान यासारख्या कित्येक दिग्गजांची नावे समोर आली.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाड्या

गाडी नंबर-MH01 CP0038

12  जाने. 2018    वेग मर्यादा न पाळणे   1 हजाराचा दंड
13  जाने. 2018   वेग मर्यादा न पाळणे    1 हजाराचा दंड
25  एप्रिल 2018   वेग मर्यादा न पाळणे    1 हजाराचा दंड  
28  एप्रिल 2018   वेग मर्यादा न पाळणे    1 हजाराचा दंड  
20  मे 2018       वेग मर्यादा न पाळणे     1 हजाराचा दंड 
21  मे 2018       वेग मर्यादा न पाळणे     1 हजाराचा दंड 
23  मे 2018       वेग मर्यादा न पाळणे     1 हजाराचा दंड 
31  मे 2018       वेग मर्यादा न पाळणे     1 हजाराचा दंड 

- Advertisement -

22  एप्रिल 2018   वेग मर्यादा न पाळणे    1 हजाराचा दंड  
28  एप्रिल 2018   वेग मर्यादा न पाळणे    1 हजाराचा दंड  
2  मे 2018          वेग मर्यादा न पाळणे    1 हजाराचा दंड  
21  मे 2018        वेग मर्यादा न पाळणे    1 हजाराचा दंड 
3  जून 2018       वेग मर्यादा न पाळणे     1 हजाराचा दंड

मुख्यमंत्र्यांना वाहतुकीचे नियम लागू होत नाहीत 
वाहतुकीसह स्पीडसंदर्भात सर्वसामान्यांना एक नियम आहे. नियमांचे उल्लघंन करणार्‍या संबंधितांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिवाला असलेला धोका पाहता त्यांना वाहतुकीचे नियम लागू होत नाहीत. त्यांच्यासोबत सतत पोलिसांचा फौजफाटा असतो. त्यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना स्पीड किंवा वाहतुकीचे नियम लागू होत नाहीत.
-अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -