Coronavirus Mumbai: मुंबईत आज १३१० नव्या रुग्णांची नोंद; ५८ मृत्यू

मुंबईत आज १ हजार ३१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४ हजार ५७२ वर पोहचली आहे. तर ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ८७२ वर पोहचला आहे.

Mumbai Corona Update: 351 corona cases recorded in last 24 hours in mumbai
Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद

मुंबईत आज १ हजार ३१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४ हजार ५७२ वर पोहचली आहे. तर ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ८७२ वर पोहचला आहे. तर आज १ हजार ५६३ जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ७५ हजार ११८ जणांनी कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा ७१ टक्के इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या ५८ मृत्यूंपैकी ४८ जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पुरुष तर २१ महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी ५ जणांचे वय ४० च्या खाली होते. तर ४१ रुग्ण ६० वर्षावरील होते तर १२ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.


हेही वाचा – Coronavirus Update: राज्यात २४ तासांत तब्बल १०,५७६ नवे रूग्ण; २८० मृत्यू