घरमुंबईमुंबईच्या तुरुंगातील १३३ कैद्यांना ‘एचआयव्ही’ची लागण

मुंबईच्या तुरुंगातील १३३ कैद्यांना ‘एचआयव्ही’ची लागण

Subscribe

गेल्या तीन वर्षांत भायखळा आणि आर्थर रोड या तुरुंगातील मिळून १३३ कैद्यांना एचआयव्ही असल्याचं निदान झालं आहे. कैद्यांच्या वैद्यकिय तपासणीवरून ही माहिती समोर आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात सतत केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे एचआयव्ही हा आजार पसरण्याचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. पण, मुंबईत अनेक गुन्ह्यांसाठी तुरुंगात असणाऱ्या कैद्यांमध्ये एचआयव्ही होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मुंबईच्या भायखळा आणि आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांवर मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीकडून उपचार केले जातात. त्यातून, त्यांच्या अनेक तपासण्या केल्या जातात. या तपासणीतून समोर आलेल्या आकडेवारीतून गेल्या तीन वर्षात शंभरहून अधिक कैद्यांना एचआयव्हीची लागण झाली असून सध्या या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. या कैद्यांमध्ये महिला आणि पुरुष कैद्यांचा समावेश आहे.

१३३ कैंद्यांमध्ये निदान

गेल्या तीन वर्षांत भायखळा आणि आर्थर रोड या तुरुंगातील मिळून १३३ कैद्यांना एचआयव्ही असल्याचं निदान झालं आहे. आर्थर रोड तुरुंगात डिसेंबर, २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या एआरटी केंद्रात डिसेंबर ते मार्च या कालावधीत २६ नवीन एचआयव्ही रुग्ण आढळून आले आहेत. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण सर्वाधिक आहे.

- Advertisement -

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून मिळालेल्या माहितीनुसार,
२०१६ – १७ या वर्षात ४ हजार ५८६ कैद्यांची एचआयव्ही चाचणी केली गेली. यात ५८ कैद्यांना एचआयव्हीचं निदान झालं.
२०१७ – १८ या वर्षांत ४ हजार ५१७ कैद्यांची तपासणी केली असता २७ कैदी एचआयव्ही पॉझिटीव्ह आढळून आले.
२०१८ – १९ या कालावधीत ६ हजार ०६९ कैद्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली असता यात ४८ जणांना हा आजार होता.

याविषयी अधिक माहिती देताना मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितलं की, “अनेकदा कैद्यांना आजार झाला की, त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. त्या तपासण्यातून कळतं की त्यांना एचआयव्ही आहे. तुरुंगात आणलेले कैदी हे फक्त मुंबईचेच नसतात. वेळीच आजाराचे निदान आणि उपचार न मिळाल्याने कैद्यांचा मृत्यू होतो. यासाठी, तुरुंगात एचआयव्ही तपासणी करण्यात येते. एचआयव्ही चाचणीत पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांवर जेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या एआरटी केंद्रामध्ये उपचार केले जातात.’’

- Advertisement -

“मुंबईतील भायखळा जेल आणि आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांना प्राथमिक उपचार आणि औषधांसाठी जे. जे. रुग्णालयात किंवा केईएम रुग्णालयात आणलं जातं. पण, अशा प्रकरणात अनेकदा कैदी संधी साधून हॉस्पिटलमधून पळून जातात. त्यामुळे, अशा घटना टाळण्यासाठी तुरुंगातच एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी एआरटी केंद्र तुरुंगातच सुरू करण्यात आलं आहे. या केंद्राद्वारे डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत २६ नवीन एचआयव्ही रुग्ण आढळून आले आहेत. यातील १९ रुग्ण उपचारांवर असून सात जणांची तुरुंगातून सुटका झाली. विशेषतः या रुग्णांना तुरुंगात आल्यावरच एचआयव्हीची लागण होते हे सांगणं कठीण आहे. पण, एचआयव्हीचं प्रमाण कमी झाल्याचंही सांगता येणार नाही.” – डॉ. श्रीकला आचार्य, अतिरिक्त प्रकल्प संचालिका, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -