घरCORONA UPDATECorona: मुंबईत २४ तासांत आढळले १,३५४ नवे रुग्ण, एकूण आकडा ९० हजार...

Corona: मुंबईत २४ तासांत आढळले १,३५४ नवे रुग्ण, एकूण आकडा ९० हजार पार!

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजार १४९वर पोहोचला असून मृतांचा आकडा ५ हजार २०२ झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे २४ तासांत २ हजार १८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ६१ हजार ९३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हर रेट ६८ टक्के आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

मुंबईत आज ९०५ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांचा आकडा ६२ हजार ७३६वर पोहोचला आहे. तसेच सध्या मुंबईत २२ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज नोंद झालेल्या मृतांमध्ये ५८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ५३ रुग्ण पुरुष आणि २० महिला रुग्ण होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षा खाली होते, ५५ जणांचे वय ६० वर्षा वर होते, तर उर्वरित १६ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

आज मुंबईतील धारावीत कोरोनाचे १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३५९वर पोहोचला आहे. तर दादरमध्ये आज ३५ आणि माहिममध्ये २३ नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दादरमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार १०२ तर माहिममधील १ हजार ३३९ झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: राज्यात आज दिवसभरात ७,८६२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -