Corona Update: मुंबईत आज १,३७२ नव्या रुग्णांची नोंद, एकूण आकडा ८१ हजार पार!

1,372 new corona positive patient found in 73 deaths in 24 hours in mumbai
Corona Update: मुंबईत आज १,३७२ नव्या रुग्णांची नोंद, एकूण आकडा ८१ हजार पार!

मुंबईत आज १ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार ६३४वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ४ हजार ७५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज मुंबईत १ हजार ६९८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५२ हजार ३९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोनाचे १ हजार १३९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार ५२१ वर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

आज नोंद झालेल्या ७३ मृत्यू गेल्या ४८ तासांत झाले आहेत. यामधील ५८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच नोंद झालेल्या मृतांपैकी ४९ पुरुष रुग्ण आणि २४ महिला रुग्ण होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० वर्षाखाली होते, ४० जणांचे वय ६० वर्षावर होते, तर उर्वरित २९ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

मुंबईतील रिकव्हरी ६४ टक्के एवढा आहे. २ जुलैपर्यंत ३ लाख ४४ हजार ९६८ कोरोनाच्या एकूण चाचण्या झाल्या आहेत. धारावीत आज ८, दादरमध्ये २७, तर माहिममध्ये ३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत एकूण बाधितांचा आकडा २ हजार ३०९, दादरमधील ९१४, तर माहिमधील १ हजार १९० झाला आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत सर्वाधिक नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद!