Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी लोणावळ्याला जाताय? आधी हे वाचा, १४४ कलम लागू

लोणावळ्याला जाताय? आधी हे वाचा, १४४ कलम लागू

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आली असताना लोणावळ्यात कोरोना नियमांची पायमल्ली करत काही हौशी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोकाही वाढला आहे. यापार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.तर वाहनांना भुशी डॅम व इतर धबधब्यांपासून एक किलोमीटर परिसरात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

दरवर्षी लोणावळ्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. येथील भुशी डॅम हा पर्यटकांचा आवडता स्पॉट. पण कोरोनामुळे पर्य़टनावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपासून नागरिक लोणावळ्यात गर्दी करत आहेत. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे भुशी डॅम, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, मंकी पाईंट,कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड,,घुबड तलाव, पवना डॅम, तिोकणा किल्ला, भाजे धबधबा या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

पाच पेक्षा जास्त व्यक्तींना पर्यटन स्थळ परिसरात एकत्र येण्यावर बंदी

धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना नो एन्ट्री

- Advertisement -

धोकादायक ठिकाणं, वळणं, धबधबे, दरीचे कठडे अशा ठिकाणी सेल्फी काढण्यास मनाई

धबधबे व पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई

पाण्यात उतरण्यास, पोहण्यास मनाई

धबधबे असणाऱ्या परिसरात मद्यपान करण्यास मनाई. तसेच मद्य बाळगण्याबरोबरच त्याची वाहतूक करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे,

बेदरकारपणे वाहन चालवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या फेकणे, प्लासि्टी

महिलांबरोबर गैरवर्तन करण्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

- Advertisement -