Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई किडनी देऊन चार कोटी कमावण्याच्या नादात गमावले १५ लाख रूपये!

किडनी देऊन चार कोटी कमावण्याच्या नादात गमावले १५ लाख रूपये!

Related Story

- Advertisement -

गुजरातमधील अहमदाबाद येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना महामारीदरम्यान, किडनी विकून चार कोटी रुपये मिळविण्याच्या लोभात बेरोजगार असलेल्या तरूणाने १५ लाख रुपये गमावल्याचे सांगितले जात आहे. गुजरातच्या डायमंड अँड सिल्क सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूरतचा अरबाज राणा जुन्या गाड्यांचा व्यवसाय करायचा, परंतु कोरोना काळात हा व्यवसाय बंद पडल्यानंतर त्याला किडनी विकून चार कोटी रुपये कमविण्याची ऑफर मिळाली आणि त्याने ही संधी सोडली नाही.

असा घडला प्रकार

एका वेबसाईटवर किडनी दान करून त्याबदल्यात चार कोटी रूपये मिळणार अशा आशयाची जाहीरात पाहून तरूणला चांगलाच फटका बसल्याचे समोर आले आहे. तरूणाने ही जाहीरात बघितल्यानंतर शिल्पा कुमारी यांच्याशी दक्षिण भारतातील रूग्णालयात संपर्क साधला. बेंगळुरूच्या मनिपाल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करणारी शिल्पा कुमारी यांनी अरबाजला सांगितले की, जर त्याने येथे आपली किडनी दान केली तर त्या बदल्यात त्यांना चार कोटी रुपये मिळतील. डॉक्टर शिल्पा कुमारीने अरबाजला काही दिवस सोशल मीडियावर मेसेजद्वारे गुंतवून ठेवले होते. किडनी दानची प्रक्रिया आणि नोंदणीच्या नावाखाली शिल्पा कुमारीने अरबाजकडून तब्बल १४ लाख ८० हजार रुपये काढून घेतले. प्रत्येकी दोन लाख रुपये तिने तिच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि नंतर फोन बंद करून तिने अरबाजची मोठी फसवणूक केली.

- Advertisement -

हा प्रकार घडल्यानंतर अरबाजने सूरत गुन्हे शाखेकडे तक्रार केली. सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त युवराजसिंग गोहिल यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. युवराज सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा कुमारीने बनावट डॉक्टर बनून हा सगळा प्रकार केला आणि अरबाजकडून लाखो रुपये तिच्या खात्यात ट्रान्सफर केले होते, ती बर्‍याचदा सोशल मीडियाद्वारे ती लोकांना तिच्या जाळ्यात अडकवायची. साधारण १५ लाख रुपयांच्या ऑनलाइन फसवणूकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी हा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील ही पहिलीच वेळ नसून बऱ्याचदा अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट यासारख्या शहरांमध्ये दररोज अशी प्रकरणे चर्चेत येत असतात, ज्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष पैसा कमावण्याच्या लोभापोटी बळी पडतात किंवा ब्लॅकमेलिंग प्रकारात फसतात.


SSC Result 2021 Maharashtra Board: महाराष्ट्राच्या मुली हुशारSS

- Advertisement -