घरताज्या घडामोडीनिजामुद्दीन मरकजप्रकरण: दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन

निजामुद्दीन मरकजप्रकरण: दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन

Subscribe

भिवंडीतील १५ जणांनी एकाच ट्रेनमधून प्रवास केला असून १३ जण क्वारंटाईन तर दोन जणांचा शोध सुरू आहे.

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर उपाय योजना म्हणून केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले आहे. मात्र शासनाच्या निर्बंधा नंतरही दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विदेशी नागरिकांसह देशातील आणि राज्यातीलही अनेक भागातील नागरिकांचा सहभाग असल्याचे आता समोर आले आहे. त्यातच दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रमात देशभरातून सहा हजारांहून अधिक नागरिक सहभागी असल्याची माहिती आता समोर येत असून त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचेही वृत्त माध्यमांसमोर आले असल्याने या कार्यक्रमामुळे देशभर खळबळ उडाली आहे. असे असतांना भिवंडी सारख्या कामगार नगरी आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या शहरातून देखील दिल्ली येथील तबलीगी कार्यक्रमासाठी तसेच या कार्यक्रमादरम्यान दिल्ली ट्रेन प्रवासात एकूण १५ नागरिक सहभागी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन जणांचा शोध सुरू 

या १५ जणांपैकी ९ जणांना दिल्ली येथेच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर चार जणांना भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात हलविण्यात आले आहे. मात्र यातील दोन प्रवाशांचा अजूनही शोध लागला नसल्याची माहिती भिवंडी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे. दरम्यान हे दोन जण अजूनही सापडले नसल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या नागरिकांनी स्वतःहून शासनाकडे अथवा पोलीस प्रशासनाकडे आपली माहिती द्यावी, असे आवाहन शासनाकडून वारंवार होत असूनही या दोन जणांचा अजूनही शोध लागला नाही. दरम्यान भिवंडीत आतापर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही, मात्र या दिल्ली प्रवासातील नागरिकांच्या संख्येमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनचे भिवंडीकरांनी काटेकोर पालन करावे

दरम्यान या १५ जणांपैकी सर्वांनीच तबलीगी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, मात्र काहींनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता, तर काहींनी एकाच ट्रेन मधून प्रवास केल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यादरम्यान दिल्ली ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या अथवा तबलीगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन नागरिकांचा शोध सुरू असून याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस अथवा मनपा प्रशासनाकडे माहिती द्यावी. तसेच शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे भिवंडीकरांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन भिवंडी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी केले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: मुंबई विद्यापीठाला लॉकडाऊनमध्ये अंतरिम उन्हाळी सुट्टी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -