घरताज्या घडामोडीWater Cut : मुंबईकरांसाठी खुशखबर ! १५ टक्के पाणी कपात रद्द

Water Cut : मुंबईकरांसाठी खुशखबर ! १५ टक्के पाणी कपात रद्द

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक भातसा तलावाच्या ठिकाणी कार्यरत विद्युत केंद्रात २७ फेब्रुवारी रोजी अचानकपणे मोठा बिघाड झाला होता. सदर विद्युत केंद्रात १५ मीटर खाली बिघाड झाल्याने दुरुस्ती कामात मोठ्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. परिणामी मुंबईच्या पाणीपुरवठयात १५ टक्के पाणीकपात करण्यात आली.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या भातसा तलावाच्या ठिकाणी जल विद्युत केंद्रात बिघाड झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत १५ टक्के पाणी कपात लादण्यात आली होती; मात्र भातसा धरणामधून २ हजार दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाल्याने सदर १५ टक्के पाणी रद्द करण्यात आली आहे. मात्र भातसा जल विद्युत केंद्राच्या ठिकाणी जो मोठा बिघाड झाला होता तेथे अद्यापही दुरुस्तीचे काम सुरु असल्याने मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने केले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक भातसा तलावाच्या ठिकाणी कार्यरत विद्युत केंद्रात २७ फेब्रुवारी रोजी अचानकपणे मोठा बिघाड झाला होता. सदर विद्युत केंद्रात १५ मीटर खाली बिघाड झाल्याने दुरुस्ती कामात मोठ्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. परिणामी मुंबईच्या पाणीपुरवठयात १५ टक्के पाणीकपात करण्यात आली.
या पाणीकपातीचे पडसाद स्थायी समितीच्या मागील बैठकीत उमटल्याने अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पाणी संकटावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत असून लवकरच दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते.

- Advertisement -

त्यानुसार त्यांनी आपला शब्द खरा ठरवला. मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भातसा धरणातून पर्यायी दोन हजार दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करण्यात आल्याने सध्या सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. मात्र विद्युत केंद्रात दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते काम पूर्ण करण्यासाठी आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे व अतिरिक्त पाणीसाठा करुन ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांनी केले आहे.


हेही वाचा – National Common Mobility Card : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बेस्टकडून नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -