घरमुंबईस्वर्गात जाण्याची आस; अल्पवयीन मुलीने घेतला गळफास!

स्वर्गात जाण्याची आस; अल्पवयीन मुलीने घेतला गळफास!

Subscribe

मुंबईच्या भोईवाडा परिसरात एका किशोर वयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला यूट्यूबवर आत्म्यांचे विविध व्हिडिओ पाहण्याची सवय होती. या व्हिडिओजमुळे तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वर्ग आणि नर्क या संकल्पना नक्की काय आहेत, याबाबत मोठे गूढ आहे. या विषयावर बरेच संशोधन देखील झाले आहे. परंतु, विज्ञानाने अशा कुठल्याच संकल्पनांना मान्य केलेले नाही. तरीही काही व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. अशा व्हिडिओला बळी पडून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. ही मुलगी यूट्यूबवर आत्म्यांचे विविध व्हिडिओ पाहत असायची. या मुलीने बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही मुलगी मुंबईच्या भोईवाडा परिसरात वास्तव्यास होती. या मुलीला ‘टिक टॉक’ या अॅपवर व्हिडिओ अपलोड करण्याची सवय होती. शुक्रवारी या मुलीच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्यामुळे ती सतत मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती. ती तो व्हिडिओ टिक टॉकवर अपलोड करत होती. तर, आजीने तिला असे करण्यापासून रोखले होते. आजीने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे ती बाथरुममध्ये गेली आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीला यूट्यूबवर आत्म्यांचे विविध व्हिडिओ पाहण्याची सवय होती.

हेही वाचा – बलात्कार करणाऱ्यांना क्लिन चीट; पीडितेची आत्महत्या

- Advertisement -

व्हिडिओ पाहून आत्महत्या; घरच्यांचा दावा

आत्महत्या करणाऱ्या या मुलीचे नाव नेहा असे आहे. नेहाचे इतर मित्रमैत्रीणी टिक टॉकवर व्हिडिओ अपलोड करत असत. ते पाहून तिनेही टिक टॉकवर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. तिच्या व्हिडिओला लोकांच्या चांगल्या कमेंट्स मिळू लागल्या. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा नवे व्हिडिओ तयार करुन अपलोड करु लागली. वडिलांच्या वाढदिवशी तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर तिने बाथरुममध्ये तिच्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. घरच्यांना संशय आल्याने त्यांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. त्यात नेहाने गळफास घेतल्याचे दिसले. नेहाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिची प्राणज्योत मावळली. पोलिसांना याप्रकरणी सुसाईड नोट न मिळाल्यामुळे भोईवाडा पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी नेहाच्या घरच्यांची चौकशी केली असता, ए़क धक्कादायक बाब समोर आली. या मुलीला यूट्यूबवर विविध आत्म्यांचे व्हिडिओ बघायची आवड होती. मृत्यू केल्यानंतर काय होते, याचे गूढ जाणून घेण्यासाठी ती असे व्हिडिओ पहायची. तिने याअगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी नेहाचा मोबाईल ताब्यात घेतला असून तिने पाहिलेल्या व्हिडिओची समरी पोलीस पाहणार आहेत.

हेही वाचा – आईच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी तरुणाने केली आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -