घरअर्थजगतएप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 15,900 कोटींची गुंतवणूक

एप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 15,900 कोटींची गुंतवणूक

Subscribe

एप्रिलमध्ये एसआयपीद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीत मात्र किंचितशी घट झाली आहे. गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये एसआयपीद्वारे 11,863 कोटी रुपये गुंतवले. मार्चमध्ये एसआयपीची गुंतवणूक 12,378 कोटी रुपये होती.

देशातील शेअर बाजारात अस्थिरता असली तरी म्युच्युअल फंड उद्योगाने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली केली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मार्गाने गुंतवणूकीचा ओघ चांगला राहिला आहे. एप्रिलमध्ये देशातील शेअर बाजारातील अस्थिरता आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली असली तरी इक्विटी म्युच्युअल फंडात 15,900 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. इक्विटी फंडांमधील गुंतवणूक जवळपास पाच पटीने वाढली आहे. तर सलग 14 व्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये चांगली गुंतवणूक राहिली आहे.

डेट आणि इक्विटी फंडांद्वारे आलेल्या गुंतवणुकीमुळे एप्रिलअखेर म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण मालमत्ता 38.9 लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे.  इंडस्ट्री बॉडी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Amfi) ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अॅम्फीचे  मुख्य कार्यकारी एन एस व्यंकटेश यांच्या मते, एप्रिलमध्ये शेअर बाजारात अस्थिरता असूनही किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास कायम राहिला आहे.  इक्विटी फंडांमधधील गुंतवणूक एका वर्षात 36 टक्के वाढून उच्चांकावर पोहोचली आहे.  एप्रिलअखेरीस किरकोळ गुंतवणूकदारांची एकूण गुंतवणूक 18.9 लाख कोटी रुपये राहिली आहे.

गेल्या महिन्यात सेक्टरल आणि थीमॅटिक फंडांमध्ये गुंतणुकीचा निव्वळ ओघ 3,843 कोटी रुपये होता. तर लार्ज आणि मिड कॅप योजनांमध्ये  2,050 कोटी आणि मिड कॅप फंडांमध्ये  1,575 कोटींची गुंतवणूक झाली.  नऊ प्रकारच्या शुद्ध इक्विटी योजनांद्वारे एकूण 15,900 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. एप्रिल 2021 मध्ये हा आकडा 3,437 कोटी रुपये होता.  इक्विटी फंडांमधील गुंतवणूक जवळपास पाच पटीने वाढली असल्याचे अॅम्फीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

- Advertisement -

एप्रिलमध्ये एसआयपीद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीत मात्र किंचितशी घट झाली आहे. गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये एसआयपीद्वारे 11,863 कोटी रुपये गुंतवले. मार्चमध्ये एसआयपीची गुंतवणूक 12,378 कोटी रुपये होती. याबाबत मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक (व्यवस्थापक संशोधन) हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये बाजारांमध्ये तीव्र चढ-उतार पाहिल्यानंतर, अलीकडे गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.

एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात सेन्सेक्सने मोठी वाढ नोंदवली.  मार्च अखेरीस सेन्सेक्स 58,569 अंकावर होता. त्यानंतर 4 एप्रिलपर्यंत सेन्सेक्सने 60,612 पर्यंत उसळी मारली. मात्र, त्यानंतर राजकीय तणाव आणि यूएसमधील दरांमध्ये वाढीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 56,463 अंकांचा निचांक नोंदवून  57,061 वर आला.

अॅम्फीच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये इक्विटीशिवाय सहा वेगवेगळ्या उप-श्रेणींखालील हायब्रीड फंडांमध्ये 7,240 कोटींची तर आर्बिट्रेज फंडात 4,100 कोटींची गुंतवणूक झाली आहे.  याशिवाय ईटीएफ आणि आणि गोल्ड ईटीएफ फंडांमधील गुंतणूकीतही जोरदार वाढ झाली आहे.  ईटीएफ योजनांमध्ये मार्चमधील 6,906 कोटी रुपयांच्या तुलनेत एप्रिलमध्ये 8,663 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर गोल्ड ईटीएफ योजनांमध्ये मार्चमधील 205 कोटी रुपयांच्या तुलनेत 1,100 कोटी रुपयांची गुंतणवणूक आली आहे. एप्रिलमध्ये केवळ इंडेक्स फंडांच्या गुंतणूक घट झाल्याचे दिसून आले.  एप्रिलमध्ये इंडेक्स फंडांमध्ये 6,062 कोटींंची गुंतवणूक झाली. मार्चमध्ये हा आकडा मार्चमध्ये 12,313 कोटी रुपये होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -