घरताज्या घडामोडी'त्या' १७४ कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराच्या डिपॉझिटमधून पगार; यशवंत जाधव यांचे आदेश

‘त्या’ १७४ कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराच्या डिपॉझिटमधून पगार; यशवंत जाधव यांचे आदेश

Subscribe

मुंबई महापालिकेच्या २४ वार्डातील नागरी सुविधा केंद्रांत प्रामाणिकपणे काम करूनही १७४ कर्मचाऱ्यांचा गेल्या सहा महिन्यांचा पगार ‘अलंकीत’ या कंत्राटदाराने थकवला. या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा आली. या प्रकरणाला पालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी, वाचा फोडत त्यांना न्याय देण्याची जोरदार मागणी स्थायी समितीच्या बैठकीत लावून धरली. त्याची दखल घेत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिकेने सदर कंत्राटदाराच्या जमा डिपॉझिटच्या रकमेमधून या कर्मचाऱ्यांचा पगार चुकता करण्याचे आणि कर्मचाऱ्यांचा सामावून घेण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे या १७४ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई पालिकेने नागरिकांना विविह प्रमाणपत्र, कर भरणा करणे आदी नागरी सेवासुविधा पुरविण्यासाठी मुंबईतील २४ वॉर्ड कार्यालयात नागरी सुविधा केंद्रे सुरू केली. त्याठिकाणी ही केंद्रे चालवण्यासाठी ‘अलंकित’ कंपनीला जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, ‘अलंकीत’ कंत्राटदाराने कोरोना कालावधीतही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या १७४ कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच दिला नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांनी नाईलाजाने काम थांबवले होते. परिणामी पालिकेने या नागरी सुविधा केंद्रात आपले कर्मचारी सेवा देण्यासाठी ठेवले.

- Advertisement -

या गंभीर घटनेची दखल घेऊन सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीच्या मागील बैठकीत आणि आज पार पडलेल्या बैठकीतही या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार आणि त्यांच्यावर कंत्राटदाराकडून झालेल्या अन्यायाला वाचा फोडत न्याय देण्याची जोरदार मागणी लावून धरली. दरम्यान, पालिकेने अलंकितचे कंत्राट रद्द केले असून ते कंत्राट विदर्भ इन्फोटेकला दिले आहे.

या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, कंत्रादार ‘अलंकीत’ याच्या एक कोटी रुपयांच्या डिपॉझिट रकमेमधून त्या १७४ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांचा थकीत पगार देण्यात यावा आणि नवीन कंत्राटदाराने १७४ कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घ्यावे, असे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लोकमान्य टिळक रुग्णालयाचे उपाधिष्टाता डॉ. राकेशकुमार वर्मा यांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -