घरमुंबई१९ बारबालांना लपवले होते 'भिंतीत', पोलिसांनी मुलींची केली सुटका

१९ बारबालांना लपवले होते ‘भिंतीत’, पोलिसांनी मुलींची केली सुटका

Subscribe

गोरेगावस्थित या बारमध्ये बारबाला असल्याचा ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता. या बारमध्ये बारबाला असल्याचा एक व्हिडिओ हाती लागला होता.

जर तुम्ही अजय देवगणचा रेड सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला त्याने राजकारण्याच्या घरी टाकलेल्या रेडमध्ये भिंतीमध्ये लपवलेला ऐवज पाहून अनेकांचे डोळे उघडेच राहिले असतील. अगदी तसाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. पण यात भिंतीत किंमती वस्तू नाही तर चक्क मुलींना भिंतीत लपवून ठेवण्यात आले होते. मुंबईतील गोरेगाव येथील एका बारमध्ये हा प्रकार घडला असून चक्क स्वयंपाकखोलीच्या भितींमधून १९ मुलींना बाहेर काढून मुंबई पोलिसांनी त्यांची मुक्तता केली आहे.

वाचा- बँक कॅशियरने ‘छमछम’वर उडवले लाखो रुपये

नेमकं प्रकरण काय?

गोरेगाव लिंक रोडमध्ये असलेल्या गार्डन व्यू बारमध्ये १० बारबाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यावर रात्री १२.३० मिनिटांनी पोलिसांनी या बारवर धाड टाकली. त्यावेळी तेथे त्यांना बारबाल्या सापडल्या नाहीत. पण मिळालेली माहिती खरी असल्यामुळे पोलिसांनी तपास सुरुच ठेवला. त्यांनी या बारचा पॉवर सप्लाय बंद केल्यानंतर बारबालांनी वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केली. पण हा आवाज कुठून येत आहे. हे पोलिसांना कळतच नव्हते. बारमालकाशी आणि कॅशिअरशी अधिक चौकशी केल्यानंतर किचनमध्ये एक भिंत तयार करण्यात आली होती आणि त्यात त्यांना लपवण्यात आल्याचे समोर आले.या भिंतीतून तब्बल १९ बारबालांची सुटका पोलिसांनी केली आहे. तर बार मालक, चालक, कॅशिअर अशा एकूण १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -
वाचा- ‘छमछम’ला मिळणार हिरवा कंदील?

ती होता सबळ पुरावा?

गोरेगावस्थित या बारमध्ये बारबाला असल्याचा ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता. या बारमध्ये बारबाला असल्याचा एक व्हिडिओ हाती लागला होता. त्यानुसारच पोलिसांनी कारवाई करायचे ठरवले होते.

 हे माहित आहे का ? –नोकरीचे आमिष दाखवून वेशव्यवसायात अडकवणारे त्रिकुट अटकेत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -