घरमुंबईविनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल 193.62 कोटींचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल 193.62 कोटींचा दंड वसूल

Subscribe

७ तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी प्रत्येकी 90 लाखांपेक्षा जास्त वसूल केले

विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्ये रेल्वेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करत आहे. या तपासणीतून मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल 193.62 कोटींचा दंड वसूल केला आहे.

विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यानुसार एप्रिल-ऑक्टोबर 2022 दरम्यान विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण 209.03 लाख प्रकरणे आढळून आली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 16.16 लाख प्रकरणे होती, ज्यामध्ये 79.46 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.

- Advertisement -

अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेला महसूल एप्रिल-ऑक्टोबर 2022 या कालावधीत 193.62 कोटी नोंदवला गेला, तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 93.29 कोटींची नोंद झाली होती, त्यात 107.54 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ऑक्‍टोबर 2022 या महिन्‍यात, विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या व बुक न केलेल्या सामानासह 4.44 लाख प्रकरणांद्वारे मध्य रेल्वेने 30.35 कोटींचा महसूल नोंदविला आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले. 2022 – 23 या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी कर्मचार्‍यांपैकी चार जणांनी एक कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा करून उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत

१)  डी. कुमार, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी १५.०५३ प्रकरणांमधून रु. १.४३ कोटी,
२) एस. बी. गलांडे, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी १४,८३७ प्रकरणांमधून रु. १३.४ कोटी,
३) एच. ए. वाघ, टीटीआय, मुख्यालय मुंबई यांनी ११,६३४ प्रकरणांमधून रु. १.०४ कोटी,
४) सुनील डी. नैनानी, टीटीआय, मुंबई विभाग यांनी १२,१३७ प्रकरणांमधून रु. १.०३ कोटी.

याशिवाय, भुसावळ विभागातील २ आणि पुणे विभागातील एक असे तीन तिकीट तपासणी कर्मचारी आहेत ज्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात ९० लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत.

.के.के. पटेल, मुख्य तिकीट परीक्षक, भुसावळ विभाग यांनी ११,३३६ प्रकरणांमधून रु. ९९.२३ लाख.
विनय ओझा, मुख्य तिकीट निरीक्षक, भुसावळ विभाग यांनी ११,८१८ प्रकरणांमधून रु.९३.५४ लाख,
एस.एस. क्षीरसागर, मुख्य तिकीट निरीक्षक, पुणे विभाग यांनी ९,६२३ प्रकरणांमधून रु.९१.४४ लाख.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.


प्रकल्प नाकारल्यास कागद दाखवा, भागवत कराड खोटं बोलणं बंद करा, जयंत पाटलांनी सुनावले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -