घरCORONA UPDATEअखेर मुंबईतले २ किलोमीटरचे निर्बंध हटवले!

अखेर मुंबईतले २ किलोमीटरचे निर्बंध हटवले!

Subscribe

२ किलोमीटरचे निर्बंध शासनाने हटवले. आसपासच्या परिसरात जाण्यावरचे निर्बंध हटवले. मात्र, शहरभर प्रवास करण्यावर बंदी कायम असणार. आसपासच्या परिसराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास गाडी जप्तीची देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या निर्णयाचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. ‘ही २ किलोमीटरची अट कशाच्या आधारावर आली माहीत नाही. अनलॉकच्या काळात लोकांना इतर कामं करायची आहेत. साध्या कामासाठी घरातून बाहेर पडलो, तरी सहज २ किलोमीटरच्या बाहेरचा प्रवास होतो. पण आता ती अट रद्द करण्यात आली हा योग्य निर्णय आहे’, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान, या निर्बंधाशिवाय इतर अटी मात्र मुंबईत कायम असणार आहेत.

या निर्णयावर राम कदम यांनी मात्र टीका केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारने दोन किलोमीटरचा नियम सांगून 40 हजार पेक्षा अधिक गाड्या जप्त जप्त करून त्याला मोठा दंड आकारला आधीच खिशात पैसे नाहीत त्यातून सरकारची अशी दादागिरी? आता कळतंय कि दोन किलोमीटर शब्द काढला आणि नवीन नेबरहूड हा शब्द आला. परंतु मुंबईकरांना झालेला त्रासाचं त्यांच्या दंडासाठी भरलेल्या पैशाचं काय? सरकारच्या लहरी स्वभावामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास झालाय. सरकारने जनतेची माफी मागत त्यांच्याकडून दंड वसूल केला त्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -