Coronavirus: धारावीत पुन्हा एकदा विशी गाठली

7 new corona positive patient found in dharavi mumbai
धारावीत कोरोनाचा वेग मंदावला; दिवसभरात अवघे ७ रुग्ण आढळले

मागील पाच जूनपासून विशीच्या आत रुग्ण संख्या आलेल्या धारावीत पुन्हा एकदा विशी गाठली आहे. धारावीतील रुग्ण संख्या दहापर्यंत आल्याने समाधानाची बाब व्यक्त होत असतानाच पुन्हा एकदा या विभागात २० रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत गुरुवारी दिवसभरात २० रुग्ण आढळून आले. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या १९८४ एवढी झाली आहे. या एकूण रुग्णा संख्यांपैकी ९९५ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत. तर सध्या ९१४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र, धारावीत आतापर्यंत ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

धारावी पाठोपाठ दादरमध्ये २५ आणि माहिममध्ये १३ रुग्ण अशाप्रकारे दोन्ही ठिकाणी ३८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दादरमध्ये एकूण रुग्णांची संख्या ४७१ तर माहिमची एकूण रुग्ण संख्या ७१४ वर पोहोचली आहे. तर दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १५ व १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दादरमधील एकूण ४७१ रुग्णांपैकी २२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर माहिममधील एकूण ७१४ रुग्णांपैंकी ३१७ रुग्ण बरे झाले आहेत, तर उर्वरीत ३८३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

२ जून २०२० : रुग्ण संख्या २५, एकूण संख्या : १८३०

३ जून २०२० : रुग्ण संख्या १९, एकूण संख्या : १८४९

४जून २०२० : रुग्ण संख्या २३, एकूण संख्या : १८७२

५जून २०२० : रुग्ण संख्या १७, एकूण संख्या : १८८९

६जून २०२० : रुग्ण संख्या १०, एकूण संख्या : १८९९

७जून २०२० : रुग्ण संख्या १३, एकूण संख्या : १९१२

८जून २०२० : रुग्ण संख्या १२, एकूण संख्या : १९२४

१० जून २०२० : रुग्ण संख्या ११, एकूण संख्या : १९६४

११जून २०२० : रुग्ण संख्या २०, एकूण संख्या : १९८४