मुंबई ‘अनलॉक’! जाणून घ्या, काय सुरु? काय बंद?

मुंबईत नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? जाणून घेऊया.

Restrictions on third group in Mumbai maintained from today till June 27 - Municipal Commissioner Iqbal Singh Chahal
आजपासून २७ जूनपर्यंत मुंबईतील तिसऱ्या गटातील निर्बंध कायम - पालिका आयुक्त

राज्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे मुंबई ‘अनलॉक’ झाली असली तरी देखील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याबाबतची नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली असून या नियमावलीचे ट्विट देखील केले आहे. दरम्यान, नेमके काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार? जाणून घेऊया.

मुंबईत काय राहणार सुरु?

 • अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत दररोज सुरु राहतील
 • केमिस्ट आणि मेडिकल दुकाने सर्व दिवस २४ तास खुली ठेवण्यास परवानगी
 • आवश्यकतेतर दुकाने आणि आस्थापना सोमवार-शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
 • उपहारगृह सोमवार-शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु, ‘टेक अवे’ आणि ‘होम डिलिव्हरी’ सुरु
 • सार्वजनिक ठिकाणे पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु
 • क्रीडांगण पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु
 • लग्न सोहळ्यात ५० व्यक्ती आणि अंत्यसंस्कारला २० व्यक्तींच्या हजेरीस परवानगी
 • केवळ बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना परवानगी, इतर कामगारांना दुपारी ४ पर्यंत काम करण्याची परवानगी
 • सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी आणि सायंकाळी ५ नंतर संचारबंदी
 • व्यायामशाळा, सलून, ब्युटी सेंटर आणि स्पा ५० टक्के क्षमतेसह दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु
 • खासगी कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु
 • शासकीय आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेसह कार्यान्वित
 • स्थानिक आणि सहकारी संस्थांच्या सभा आणि निवडणुका ५०% क्षमतेसह सुरु
 • सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्क्यासह सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत सुरु
 • कृषीसंबंधी कार्य दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु
 • लोकल रेल्वे वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी सुरु
 • सार्वजनिक बेस्ट बस सेवा १०० टक्के सुरु (उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही)
 • कार्गो वाहतूक सुरु (केवळ ३ व्यक्ती-वाहनचालक आणि इतर कर्मचारी)
 • आंतरजिल्हा वाहतूक ५ व्या स्तरातील जिल्ह्यातून वाहन जाणार नसल्यास प्रवास करण्याची परवानगी
 • ई-कॉमर्स सुरु

मुंबईत काय राहणार बंद?