घरमुंबईबीकेसीमध्ये अजगरांचा सुळसुळाट, २० अजगर पकडले

बीकेसीमध्ये अजगरांचा सुळसुळाट, २० अजगर पकडले

Subscribe

शनिवारी २९ सप्टेंबरच्या रात्री बीकेसीमधून एक ११ फूटी अजगर पकडल्याची माहिती, सर्प मित्र अतुल कांबळे यांनी आपलं महानगरला दिली.

मुंबईतील ‘वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स’ (बीकेसी) या हायप्रोफाईल परिसरामध्ये अनेक मोठ्या कंपनींची कार्यालयं आहेत. अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आणि आलिशान महागडी रेस्टॉरंट अशीच बीकेसीची ओळख आहे. त्यामुळे या भागामध्ये कायमच माणसांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, सध्या या परिसरात माणसांसोबतच वन्यजीवांचा देखील वावर पाहायला मिळतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून बीकेसी परिसरात अजगरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे तुम्ही बीकेसीमध्ये पायी हिंडत असाल आणि तुमच्यासमोर एखादा अजगर आला, तर घाबरुन जाऊ नका. कारण बीकेसी हे आता अजगरांचं घरच झालं आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ९ महिन्यांमध्ये बीकेसी परिसरातून एकूण २० अजगर पकडण्यात आले आहेत. शनिवारी २९ सप्टेंबरच्या रात्री बीकेसीमधून एक ११ फूटी अजगर पकडल्याची माहिती, सर्प मित्र अतुल कांबळे यांनी आपलं महानगरला दिली. तसंच बीकेसी परिसरातील घरांमध्ये, ऑफिसमध्ये किंवा रस्त्यांवर अजगर किंवा साप दिसल्याचे वारंवार फोन येत असल्याचेही अतुल कांबळे यांनी सांगितले.

अजगरांच्या सुळसुळाटामागील कारण काय?

सध्या बिकेसी परिसरामध्ये अनेक ठिकाणी बांधकामं सुरु आहेत. त्यातच या भागात ‘मेट्रो 3’ चे काम देखील जोरात सुरू आहे. त्यामुळे इथल्या झाडांची तसंच खारफुटींची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे खारफुटीमध्ये राहणारे साप आणि अजगरासारखे प्राणी बाहेर पडून रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे ‘तुम्हाला रस्त्यावर किंवा घराच्या आसपास जगर दिसल्याल त्यांना न मारता, त्याविषयी प्राणी मित्रांना फोन करुन खबर द्यावी’, असे आवाहन सर्पमित्र अतुल कांबळे यांनी केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -