घरताज्या घडामोडीअडीच महिन्यात 2000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

अडीच महिन्यात 2000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

Subscribe

मुंबई महापालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धाडसत्र अवलंबत गेल्या अडीच महिन्यात तब्बल दोन हजार किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच, याप्रकरणी ३१८ जणांविरोधात दंडात्मक कारवाई करून १६ लाख रुपयांची दंडवसुली केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धाडसत्र अवलंबत गेल्या अडीच महिन्यात तब्बल दोन हजार किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच, याप्रकरणी ३१८ जणांविरोधात दंडात्मक कारवाई करून १६ लाख रुपयांची दंडवसुली केली आहे. महापालिकेकडून पर्यावरणाला हानिकारक व प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली आहे. (2000 kg of prohibited plastic seized in two and a half months)

मुंबई महापालिकेने ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात जोरदार कारवाई केली होती. तसेच, दंडात्मक कारवाईचा बडगा व्यापारी, दुकानदार आदींविरोधात उगारला होता. त्याचप्रमाणे काही प्रमाणात दंडात्मक कारवाईही केली होती. मात्र, मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला.दोन वर्षे पालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईला शिथिलता दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर पालिकेने नियंत्रण मिळविले. त्यामुळे आता पालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईला गती मिळाली.

- Advertisement -

कोरोनामुळे मुंबईत मागील दोन वर्षापासून थंडावलेली प्लास्टिक बंदी कारवाई १ जुलैपासून पुन्हा धुमधडाक्यात सुरु करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यात पालिकेच्या पथकाने धाडसत्र अवलंबून मुंबईत तब्बल १९१८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. या धडक कारवाईत ३१८ जणांकडून १५ लाख ९५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.


हेही वाचा – शरद पवारांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘समर्थ आहोत आम्ही…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -