Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत 226 अतिधोकादायक इमारती; रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे महापालिकेचे आवाहन

मुंबईत 226 अतिधोकादायक इमारती; रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे महापालिकेचे आवाहन

Subscribe

मुंबई महापालिकेने मुंबईतील एकूण 226 अतिधोकादायक इमारतींची यादी पावसापूर्वीच जाहित केली आहे. तसेच, पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडून कोणतीही हानी होऊ नये यासाठी आधीच धोकादायक असलेल्या इमारती खाली करून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात जुन्या, अतिधोकादायक इमारती अथवा इमारतींचा लहान – मोठा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यामध्ये कमी – अधिक प्रमाणात जिवीत व वित्तीय हानी होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने मुंबईतील एकूण 226 अतिधोकादायक इमारतींची यादी पावसापूर्वीच जाहित केली आहे. तसेच, पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडून कोणतीही हानी होऊ नये यासाठी आधीच धोकादायक असलेल्या इमारती खाली करून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक

- Advertisement -

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी महापालिकेचे संकेतस्थळ http://www.mcgm.gov.in यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतील एकूण 226 अतिधोकादायक इमारतींमध्ये, पश्चिम उपनगरातील सर्वाधिक 126 अतिधोकादायक इमारतींचा, त्याखालोखाल पूर्व उपनगरांतील 65 अतिधोकादायक इमारतींचा आणि शहर भागातील 35 अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. (226 high-risk buildings in Mumbai; BMC appeals to residents to migrate to a safe place)

इमारत दुर्घटना घडण्यापूर्वीच पालिकेचा इशारा
पावसाळ्यात दरवर्षी घडणाऱ्या इमारत दुर्घटना लक्षात घेता मुंबई महापालिकेने, एखादी दुर्घटना घडून जिवीतहानी झाल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार असणार नाही. त्या दुर्घटनेला इमारतीमधील रहिवाशीच जबाबदार असतील, असा पूर्व इशाराही सदर रहिवाशांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

सुदैवाने, काही ठिकाणी अतिधोकादायक इमारती सदर इमारतीमधील रहिवाशांनी वेळीच रिकाम्या केल्याने व काही कालावधीतच जुनी धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन प्रस्तावित इमारत उभारल्याने तेवढ्या रहिवाशांना तरी इमारत दुर्घटना घडण्यापडून दिलासा मिळाला आहे.

धोकादायक इमारती खाली न करण्याची कारणे
सध्या अस्तित्वात असलेल्या 226 अतिधोकादायक इमारतींमधील हजारो रहिवाशांना महापालिका दरवर्षी धोकादायक इमारत खाली करण्याबाबत आवाहन करते व अनेकदा नोटिसाही बजावते. मात्र सदर धोकादायक इमारतींमधील रहिवाशी दुसरा पर्याय नसल्याने, इमारत खाली केल्यावर बिल्डरने फसवणूक केल्यास हक्काच्या घरापासून दूर जाण्याची व मालकाने घर ताब्यात घेतल्या बेघर होण्याची आंतरिक भिती आदी कारणांमुळे रहिवाशी अतिधोकादायक इमारती खाली करून स्थलांतरित होण्यास तयार नाहीत. तर काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील 226 इमारतींना, मुंबई महापालिका अधिनियम 1888 चे कलम 354 अन्वये ‘अतिधोकादायक व मोडकळीस’ घोषित करण्यात आले आहे. या इमारतींची विभागनिहाय यादी मुंबई महापालिकेचे संकेतस्थळ http://www.mcgm.gov.in यावर —-> In Focus —-> Find out more—- > Quick Links —-> List of C-1 category Dilapidated Buildings 2023-24 या क्रमाने जावून पाहता येईल. या शीर्षकात नागरिक आपली इमारत अतिधोकादायक घोषित केलेल्या यादीमध्ये आहे किंवा नाही, याची खात्री करु शकतात.

वास्तव्यास असणारी इमारत ढोबळ मानाने अतिधोकादायक झाली आहे, याची काही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. ती खालीलप्रमाणे -:
१) इमारतीच्या आर. सी. सी. फ्रेम कॉलम, बीम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत बदल होत असल्याचे आढळल्यास उदा. इमारतीचे कॉलम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा बीम झुकल्यासारखे दिसून आल्यास, इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखे दिसून आल्यास.
२) इमारतीच्या तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसून आल्यास.
३) इमारतीच्या कॉलम मधील भेगा वाढत असल्याचे दिसून आल्यास.
४) इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसून आल्यास.
५) इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखा दिसल्यास.
६) इमारतीच्या आर. सी. सी. चेंबर्स (कॉलम, बीम्स) व विटांची भिंत यातील सांधा / भेगा वाढत असल्यास.
७) स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्यास.
८) इमारतीच्या गिलाव्यामध्ये (प्लास्टर) मोठ्या प्रमाणात भेगा वाढत असल्यास.
९) इमारतीच्या काही भागात विशिष्ट आवाज होत असल्यास.
१०) इमारतीच्या स्लॅब, बीम, कॉलमच्या भेगांमुळे लोखंडी शिगांचा आकार गंजल्यामुळे कमी झालेला असल्यास.

‘सी-१’ प्रवर्गातील धोकादायक इमारतींची विभागनिहाय यादी-*

ए विभाग-
१) मेहेर मॅन्शन, कूपरेज मार्ग, कुलाबा; २) नोबल चेंबर, जन्मभूमी मार्ग, फोर्ट; ३) जे. के. सोमानी, ब्रिटिश हॉटेल लेन, फोर्ट.

बी विभाग-
१) पारेख चेंबर, १२५-१२७, शेरीफ देवजी मार्ग; २) पुरुषोत्तम इमारत, २०२-२०४, सॅम्यूएल स्ट्रिट आणि ५७-५९-६१, युसूफ मेहेरअली मार्ग; ३) २९६, सॅम्यूएल स्ट्रिट.

सी विभाग-
१) एच. एम. पेटिट विडोज होम, इमारत क्रमांक २२५, सीएस क्रमांक २१७९, भुलेश्वर विभाग, जेएसएस मार्ग आणि बीजे मार्ग, ठाकूरद्वार; २) शील भवन, इमारत क्रमांक १४, चौथा मरिन मार्ग, धोबी तलाव.

डी विभाग-
१) अखिल भारत भवन कम्पाऊंड, सी. एस. क्रमांक ३१८, ताडदेव विभाग, बेलासिस मार्ग; २) शालीमार एक्झीबिटर्स, ३३५, शालीमार हाऊस, एम.एस.अली मार्ग, ग्रँट मार्ग; ३) लोहाना महापरिषद भूवन इमारत, १०, चौथी खेतवाडी लेन, एस.व्ही.पी.मार्ग; ४) सी.एस. क्रमांक ३ ए/७३०, ताडदेव विभाग, १३६, सर्वोदय इस्टेट, सर्वोदय मिल कम्पाऊंड, उर्मी आंगन इमारतजवळ; ५) मेफेअर संकुलामधील दोन बांधकामे (गॅरेज), लीटल गिब्ज मार्ग, मलबार हिल्स; ६) ५१-सी, अमृतसरवाला पंजाबी वाळकेश्वर धर्मशाळा ट्रस्ट इमारत, बाणगंगा; ७) धनश्री इमारत, पी. जी. सोलंकी मार्ग, घास गल्ली; ८) भाटिया निवास, बाणगंगा छेद गल्ली.

ई विभाग-
१) त्रिवेणी अपार्टमेंट, मकबा चाळीजवळ, एस. ब्रीज, भायखळा (पश्चिम); २) बॉम्बे सोप फॅक्टरी, हुसैनी बाग, मदनपुरा.

- Advertisment -