एकीकडे राज्यातला रिकव्हरी रेट वाढत असताना मुंबईत मात्र नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल २२८२ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १ लाख ९६ हजार ४५९ इतकी झाली आहे. यापैकी २८ हजार ५६८ Active रुग्ण आहेत. मात्र, दुसरीकडे दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८ हजार ७४७ इतका झाला आहे. आजच्या मृतांपैकी २९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये २ जण ४० वर्षांखालील, २४ जण ६० वर्षांवरील आणि १८ जण ४० ते ६० या वयोगटातले होते. आझ १९४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा पाहाता मुंबईत रुग्णांचा रिकव्हरी रेट ८१ टक्क्यांपर्यंत गेला आहे.
Mumbai Corona Update : दिवसभरात सापडले २२८२ रुग्ण, ४४ मृत्यू!
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -