घरCORONA UPDATECorona In Mumbai: २४ तासांत १,३६७ रूग्णांना डिस्चार्ज; ३८ जणांचा मृत्यू

Corona In Mumbai: २४ तासांत १,३६७ रूग्णांना डिस्चार्ज; ३८ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आतापर्यंत एकूण १ लाख २८ हजार ११२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ३७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६३ हजार ११५ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ८ हजार २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १ लाख २८ हजार ११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मृत झालेल्या रुग्णांपैकी ३१ रूग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यापैकी २६ रुग्ण पुरुष आणि १२ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० होते. तर २९ जणांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ८ रूग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते. दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत एकूण २६ हजार ६३२ रुग्ण उपचार घेत असून दुप्पटीचा दर हा ६१ दिवस असून ३ सप्टेंबर ९ सप्टेंबर दरम्यान कोविड वाढीचा दर १.१४ टक्के इतका आहे.

- Advertisement -

राज्यात आज २३ हजाराहून अधिक नवे रूग्ण

राज्यात आज दिवसभरात २३ हजाराहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,००,७१५ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,६१,४३२ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


Corona In Maharashtra: राज्यात २३,४४६ नव्या रुग्णांची नोंद; ४४८ बाधितांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -