घरमुंबईराज्यात २४८७ नवे रुग्ण ८९ करोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात २४८७ नवे रुग्ण ८९ करोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

राज्यात रविवारी २४८७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ६५५ झाली आहे. तसेच ८९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २२८६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे १,२४८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने राज्यात आजपर्यंत २९,३२९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यात ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. मुंबई -५२, नवी मुंबई -९,ठाणे – ५, कल्याण डोंबवली -४, मालेगाव -६, पुणे -९, सोलापूर -२, उस्मानाबाद -१, यवतमाळ १, आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४७ रुग्ण आहेत तर ३५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ८९ रुग्णांपैकी ५६ जणांमध्ये ( ६३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५० मृत्यूंपैकी मुंबई २७, नवी मुंबई -९, मालेगाव -६,कल्याण डोंबिवली -४, ठाणे -३, सोलापूर- १ असे आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,६२,१७६ नमुन्यांपैकी ६७,६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३५८५ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २७२२ एवढे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -