घरमुंबईराणी बागेत 3 दिवसांत 25 हजार पर्यटक; 10 लाखांचे उत्पन्न

राणी बागेत 3 दिवसांत 25 हजार पर्यटक; 10 लाखांचे उत्पन्न

Subscribe

सलग तीन दिवसांच्या सुट्टीत मुंबईकर व बाहेरील एकूण २५ हजार पर्यटकांनी भायखळा येथील राणीच्या बागेत हजेरी लावली. वाघ, पेंग्विन, विविध जातीचे पक्षी आणि अन्य प्राण्यांना पाहण्याची मजा घेत पर्यटकांनी जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला.

मुंबई : सलग तीन दिवसांच्या सुट्टीत मुंबईकर व बाहेरील एकूण २५ हजार पर्यटकांनी भायखळा येथील राणीच्या बागेत हजेरी लावली. वाघ, पेंग्विन, विविध जातीचे पक्षी आणि अन्य प्राण्यांना पाहण्याची मजा घेत पर्यटकांनी जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे राणी बागेला तीन दिवसात तब्बल १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. (25 thousand tourists in 3 days in Rani Bagh 10 lakhs income)

शुक्रवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यन्त गोविंदांनी दहीहंडी फोडण्याचा मनमुराद आनंद लुटला. तर अनेकांनी दहीहंडीचा अल्पसा आनंद लुटून आपल्या कुटुंबियांसह राणीच्या बागेत एक दिवसीय सफर करून आपला आनंद द्विगुणित केला. बच्चे कंपनी, महिला मंडळी, तरुणाई आदींनी मोठ्या संख्येने राणीच्या बागेला भेट दिली.

- Advertisement -

वास्तविक, राणीच्या बागेत दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या किमान ४ ते १० हजारावर पर्यन्त जाते. त्यामुळे राणी बागेच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ होते.
राणी बागेने गेल्या काही वर्षात कात टाकली आहे. राणी बागेची वाटचाल ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झू पार्कच्या स्तरावर सुरू आहे. त्यामुळे जेव्हापासून राणीच्या बागेत पेंग्विन दाखल झाले तेव्हापासून दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत भरमसाट वाढ होत आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने विदेशातून पेंग्विन राणी बागेत आणण्यासाठी कोट्यवधी रुपये व आणल्यावर त्याच्या देखभालीसाठीही कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे पालिकेला विरोधकांकडून टीकाटिप्पणी सहन करावी लागली. भ्रष्टाचाराचे आरोपही सहन करावे लागले व त्यावर स्पष्टीकरणही द्यावे लागले. मात्र एकदाच पेंग्विनवर केलेली गुंतवणूक व देखभालीवरील खर्चाच्या तुलनेत राणी बागेला दररोज लाखो रुपयांचे व वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने त्या खर्चाची वसुलीही चांगल्या पद्धतीने होत आहे.

- Advertisement -

गेल्या तीन दिवसांच्या सुट्टीच्या दिवसात राणी बागेत तब्बल २४ हजार ७३३ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे राणी बागेला १० लाख ४९ हजार ५३५ रुपये उत्पन्न मिळाले. यासंदर्भातील माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

तीन दिवसांत पर्यटक व महसूल

  • शुक्रवारी, ६,५६३ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे ३,३२,२५ रुपये उत्पन्न
  • शनिवारी, ४,९०६ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे १,९८,६० रुपयांचे उत्पन्न
  • रविवारी, १३,२६४ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे ५,१९,५४० रुपयांचेउत्पन्न

हेही वाचा – कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या पोस्टरवर शाईफेक; शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -