Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतल्या २६ पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा बदल्या

मुंबईतल्या २६ पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा बदल्या

Related Story

- Advertisement -

मुंबई पोलीस दलातील बदल्यांचं सत्र सुरुच आहे. पुन्हा एकदा मुंबईतल्या २६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या प्रभारीपदी नव्या पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेचे सर्व प्रभारी बदलण्यात आले होते. सचिन वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत.

सचिन वाझे काम करत होते त्या सीआययु पथकाच्या प्रभारी पदी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खंडणी विरोधी पथकाच्या प्रभारीपदी पीआय योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेत तब्बल ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -