घरमुंबईमुंबईकरांनो सावधान! ह्रदयविकारामुळे दररोज 26 लोकांचा होतोय मृत्यू, मागील वर्षाची आकडेवारी आली...

मुंबईकरांनो सावधान! ह्रदयविकारामुळे दररोज 26 लोकांचा होतोय मृत्यू, मागील वर्षाची आकडेवारी आली समोर

Subscribe

माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत 2022 मध्ये 9 हजार 470 लोकांचा मृत्यू हा ह्रदयविकारामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई म्हंटल की पहिला शब्द आठवतो तो म्हणजे, स्वप्ननगरी. या स्वप्ननगरीत अनेक जण येत असतात ते स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण यासाठी अनेक जण दिवस-रात्र एक करून मेहनत करतात. त्याचमुळे सर्वाधिक धावपळीचे जीवन म्हणून देखील मुंबईला ओळखले. असे म्हणतात की फूटपाथवर राहणारा व्यक्ती देखील रस्त्यावरची कागद गोळा करून आपले पोट भरू शकतो. त्यामुळे साहाजिकच कोणी असेल की, या स्वप्ननगरीत उपाशी झोपत असेल. पण माहितीच्या अधिकारातून या स्वप्न नगरीबाबत समोर आलेल्या माहितीमुळे सर्वांनाच नक्कीच विचार करावा लागू शकतो. कारण मागील वर्षी मुंबईत दररोज तब्बल 26 जणांना ह्रदयविकारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. ( 26 people die every day due to heart disease in Mumbai)

हेही वाचा – मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत; पोलिसांची कारवाई

- Advertisement -

माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहितीच्या कायद्या अंतर्गत अर्ज दाखल केला होता. 2022 मध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती या माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत मागविण्यात आली होती. पण यामधून समोर आलेल्या माहितीमुळे मुंबईकरांना धावपळ न करता, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन काम करणे अत्यंत गरजेचे आहे, असेच वाटू लागले आहे.

माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत 2022 मध्ये 9 हजार 470 लोकांचा मृत्यू हा ह्रदयविकारामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर त्यापाठोपाठ वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगामुळे देखील 2022 मध्ये 9 हजार 145 लोकांचे मृत्यू झाले आहेत. पण ह्रदयविकाराच्या आकडेवारीमुळे गतवर्षी दररोज 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता ही माहिती समोर आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

मार्च महिन्यात आयसीएसआर म्हणजेच, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने ‘हेल्थ ऑफ द नेशन्स स्टेट्स’ या नावाने एक अहवाल सादर केला होता. या अहवालातील माहितीनुसार, 2016 मध्ये देशात एकूण झालेल्या मृत्यूंपैकी 28.1 टक्के मृत्यू हे ह्रदयविकारामुळे झाले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षात कर्करोग आणि इतर आजारांपेक्षा देशात ह्रदयविकारामुळे अधिक मृत्यू झाले असल्याचे समोर आले आहे. हल्ली लोकांचे जीवन धावपळीचे झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक आपली काळजी घेणे मात्र विसरत असल्याने अल्पावधीतच त्यांना आपल्या प्राणांना मुकावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -