Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई मुंबईत २९ वर्षांमध्ये २९० नागरिकांनी दरडींखाली सोडला जीव, तर २२ हजार कुटुंबे...

मुंबईत २९ वर्षांमध्ये २९० नागरिकांनी दरडींखाली सोडला जीव, तर २२ हजार कुटुंबे रडारवर

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलीच नाही.

Related Story

- Advertisement -

मुंबईतील दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नसून मागील १० वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. मागील २९ वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत २९० लोकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले.

मुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघात २५७  ठिकाण डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील २२४८३ झोपड्यांपैकी ९६५७  झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळयात भूस्खलनामुळे ३२७ ठिकाणाबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.

- Advertisement -

वर्ष १९९२ ते २०२१ या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २९० लोकांनी जीव गमावला असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. २०१० मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्‍या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणा-या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते. मंडळाच्या अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर १ सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली आहेत परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करीत आहे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलीच नाही, असे गलगली म्हणाले.


Mumbai Rain Update : भांडुप पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मुंबईतील पाणी पुरवठयावर परिणाम


 

- Advertisement -