घरमुंबईतरुणीच्या छातीतून काढली ३.५ सेंटीमीटर लांबीची पिन

तरुणीच्या छातीतून काढली ३.५ सेंटीमीटर लांबीची पिन

Subscribe

चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयामधील डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी करुन काढली तरुणीच्या छातीतील पिन

चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयामधील डॉक्टरांनी १८ वर्षीय तरुणीच्या फुफ्फुसात ६ दिवस अडकून असलेली पिन आधुनिक ब्रॉन्कोस्कोपने यशस्वीपणे बाहेर काढली. २७ नोव्हेंबरला ही तरुणी रूग्णालयात दाखल झाली होती. इनाया शेख (नाव बदलले आहे) २१ नोव्हेंबर रोजी गोव्यामध्ये होती. स्कार्फ परिधान करत असताना अनवधानाने तोंडात धरलेली पिन तिने चुकून गिळली. तिला लगेचच गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. पिन नक्की कुठे अडकली आहे, ते शोधण्यासाठी तिच्या छातीचा एक्स-रे काढला. त्यावेळी ती पिन तरुणाच्या छातीत अडकली असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

नेमके काय घडले?

तोंडात धरलेली पिन या तरुणीने अचानक गिळली आणि ती पिन जाऊन छातीत जाऊन बसली. या तरुणीच्या छातीतील पिन एण्डोस्कोपीने काढण्याचा प्रयत्नही केला पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले. पण, तेथेही पिन काढण्यात यश आले नाही. अखेर ही पिन काढण्यासाठी एण्डोस्कोपी करुन ३ वैद्यकीय महाविद्यालये आणि २ रुग्णालय प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याही हाती यश आले नाही. त्यानंतर गोव्यातील रुग्णालयामधील एका डॉक्टरने शस्त्रक्रिया करून पिन काढण्यास सुचवले, पण तिच्या कुटुंबियांनी तो सल्ला मानला नाही. त्यामुळे तरुणीचे नातेवाईक पुढील उपचार घेण्यासाठी मुंबईत येण्याचा कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि ते झेन रुग्णालयामध्ये दाखल केले. अखेर झेन रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नाना यश आले असून त्यांनी त्या तरुणीच्या छातीतील पिन काढली.

3.5 cms length pin removed from the chest of the girl

- Advertisement -

या तरुणीच्या छातीत अडकलेली पिन धारदार आणि अणकुचीदार होती. ही पिन काढली नसती तर हृदय आणि फुफ्फुसातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना धोका निर्माण झाला असता. त्याचप्रमाणे ६ दिवसांपासून ती पिन तिच्या शरीरात असल्याने संसर्ग होण्याचा धोका देखील होता. तसेच ओपन सर्जरी किंवा छेद देऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अत्यंत गुंतागुंतीचा होता. कारण एण्डोस्कोपी करून पिन काढताना आतील अवयव फाटण्याचा धोका देखील होता. तसेच फुफ्फुसाचा पापुद्रा फाटण्याची शक्यता असल्यामुळे ब्रॉन्कोस्कोपी करून धारदार पिन बाहेर काढणे कठीण होते. या प्रकरणात फोरसेप्सचा वापर करून लवचिक ब्रॉन्कोस्कोपने ती बाहेर काढली.  – डॉ. अरविंद काटे, झेन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयाचे फुफ्फुसविकारतज्ज्ञ

आमची कुशल डॉक्टरांची टीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अशी गुंतागुंतीची प्रकरणे हाताळता येतात. कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी आमची कोड ब्ल्यू टीम नेहमी सज्ज असते. अशा प्रकरणांमध्ये दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच पुढील नुकसान टाळण्यासाठी लगेचच वैद्यकीय मदत घ्यावी.  – डॉ. रॉय पाटणकर, झेन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयाचे संचालक


वाचा – देशात पहिली यशस्वी कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -