घरताज्या घडामोडीधक्कादायक! शगुन दिला नाही म्हणून तृतीयपंथीयांकडून बाळाचे अपहरण करुन हत्या

धक्कादायक! शगुन दिला नाही म्हणून तृतीयपंथीयांकडून बाळाचे अपहरण करुन हत्या

Subscribe

मुंबईतील कफ परेडमधील भयंकर प्रकार

तृतीयपंथीयांना समाजात तितकासा मान नसला तरी कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी तृतीयपंथीयांना विशेष मान असतो. अनेक लग्नसमारंभांना, बारश्यांना तृतीयपंथीयांची विशेष हजेरी असते. तृतीयपंथीयांचे आशिर्वाद घेणे शुभ मानले जाते. मात्र मुंबईत तृतीयपंथीयांनी एका निरागस चिमुकलीचे प्राण घेतल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शगुनाचे पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांनी बाळाचे अपहरण करुन तिची हत्या केली. मुंबईतील कफ परेडमध्ये हा भयंकर प्रकार समोर आला आहे. (3 month old Baby girl kidnapped and murdered by trandgender for not giving money)

घरी लहान बाळाचा जन्म झाल्यावर आनंदाच्या प्रसंगी तृतीयपंथीयांची विशेष उपस्थिती असते. मुंबईच्या कफ परेड येथे राहणाऱ्या चितकोट कुंटुबात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले होते. मुलगी झाल्याने संपूर्ण घर आनंदी होती.  ८ जुलैला सायंकाळी कन्नु दत्ता ही तृतीयपंथी चितकोट यांच्या घरी पोहचली आणि मुलीच्या जन्माचा शगुन म्हणून एक साडी, नारळ आणि ११०० रुपये मागू लागली. मात्र चितकोट कुटुंबियांनी तृतीयपंथीला पैसे देण्यास नकार दिला.

- Advertisement -

शगुन न दिल्याने कन्नू दत्तला राग अनावर झाला आणि आपली साथीदार सोनू काळे सोबत चितकोट कुटुंबातील चिमुकलीच्या अपहरणाचा प्लॅन रचला. रात्री उशिराने दोघांनी चितकोट कुंटुबियांच्या घरी जाऊन ३ महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करुन आंबेडकर नगर येथील खाडीत जाऊन ३ महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली. आपली मुलगी घरातून गायब झाल्याने चितकोट कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अपहराणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता तृतीयपंथीयाला शगुनाचे पैसे न दिल्याच्या रागातून त्यांनी ३ महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करुन तिची हत्या केल्याचे समोर आले. हत्या करणाऱ्या तृतीयपंथीय आणि त्याच्या साथीदाराला कफ परेड पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आपली तान्ही लेक गमावल्याचे चितकोट कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीन महिन्यांपूर्वी घरात आलेल्या लक्ष्मीचा अशाप्रकारे अंत होईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.


हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात डॉक्टर महिलेच्या बेडरुम, बाथरुम तसेच मोबाईल चार्जर आणि LED बल्बमध्ये छुपे कॅमेरे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -