घरमुंबईरुस्तमजी ट्रुपरर्स शाळेतील ३० विद्यार्थ्यांना काढून टाकले

रुस्तमजी ट्रुपरर्स शाळेतील ३० विद्यार्थ्यांना काढून टाकले

Subscribe

मुंबईसह राज्यभरातील शाळांमधील फी वाढीचा मुद्दा गाजत असताना मुंबईत शनिवारी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये सुरु असलेल्या वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून शाळा प्रशासनाने एक दोन नव्हे तर तब्बल ३० विद्यार्थ्यांना शाळेतून काढून विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला थेट पोस्टाने घरी पाठविला आहे. दहिसर येथील रुस्तमजी ट्रुपरर्स या शाळेतील हा प्रकार असून याप्रकरणी आता मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सुनावणीसाठी बोलविली असल्याची माहिती हाती आली आहे.

दहिसर येथील रुस्तमजी ट्रुपरर्स या शाळेतील पालक प्रतिनिधी आणि शाळा प्रशासनामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फीच्या मुद्यावरुन वाद सुरु होता.या वादामुळे शाळेतील मुलांना थेट प्रवेश गमवावा लागण्याची वेळ आली आहे. या शाळा प्रशासनाने शनिवारी 30 मुलांना शाळेचा दाखला देत त्यांना शाळांतून काढून टाकले आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या घरी शाळेचा दाखला व शाळेतून काढाल्याचे पत्र पोस्टाने घरी पाठवले. एप्रिल 2018 पासून शाळेचे पालक आणी शाळा व्यवस्थापनात फी वरुन वाद सुरु आहेत. शाळेने पहिलीच्या विद्यार्थ्यांची फी 30 टक्क्यांंहून अधिक वाढवल्याने पालकने त्याचे तक्रार शिक्षण विभागाकडे केली होती.

- Advertisement -

तेव्हापासून आता पर्यंत तक्रारी संदर्भात कोणतेही आदेश न आल्याने पालकांनी जुन्या दराने शाळेला फी दिली. शाळने वारवार नव्या दराने फी भरण्यासाठी पत्र व्यवहार केला. 18 एप्रिल 2019ला पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळेला पत्र लिहुन वाढीव फी आकारण्यात का आली असे विचारले. तसेच जोपर्यंत शाळा शिक्षण विभागाच्या प्रश्नांना उत्तर देत नाही तोपर्यंत संबंधित मुलांना शाळेतून काढण्यात येवू नये असे तोंडी आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र तरीही शाळा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आम्ही शाळेची चौकशी करण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाला सोमवारी बोलवले आहे. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, पालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -