घरCORONA UPDATEदिलासा! मुंबईतल्या ३१ कोरोनाबाधित पत्रकारांना डिस्चार्ज, टेस्ट निगेटिव्ह!

दिलासा! मुंबईतल्या ३१ कोरोनाबाधित पत्रकारांना डिस्चार्ज, टेस्ट निगेटिव्ह!

Subscribe

काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यामध्ये मुंबईतल्या अनेक वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचा समावेश होता. ही बाब समोर आल्यानंतर मुंबईतल्या फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, आता या ५३ पत्रकारांपैकी ३१ पत्रकारांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्या ३१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. आता त्यांना घरीच १४ दिवस होम क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. दरम्यान, उरलेल्या पत्रकारांच्या दुसऱ्या टेस्टचे अहवाल अद्याप मिळाले नसल्याचे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे पत्रकार जेव्हा त्यांच्या घरी परतले, तेव्हा त्यांच्या सोसायटीतल्या लोकांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.

- Advertisement -

लॉकडाऊन असून देखील मुंबईत ठिकठिकाणी फिरून बातम्या गोळा करणाऱ्या पत्रकारांना कोरोनाचा धोका असल्याची चर्चा सुरूच होती. त्यातच यातल्या १६७ पत्रकारांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये तब्बल ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर २४ एप्रिल रोजी त्यांची पुन्हा दुसरी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये मात्र, त्यांनी कोरोनावर मात केल्याचं स्पष्ट झालं. आत्तापर्यंत ३१ जणांच्या टेस्टचे रिपोर्ट आले असून उर्वरीत पत्रकारांचे अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर आता या पत्रकारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकारांसोबतच काही कॅमेरामन्सचा देखील समावेश होता.

ही बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने मुंबईत फील्डवर काम करणाऱ्या सर्वच पत्रकारांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर यातल्या बहुतेक पत्रकार आणि कॅमेरामन्सनी चाचणी करून घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -