घरमुंबईमुंबईमधील रस्त्यांना ३१ मे ची डेडलाइन! रस्ते विभागाला आदेश

मुंबईमधील रस्त्यांना ३१ मे ची डेडलाइन! रस्ते विभागाला आदेश

Subscribe

मुंबईमध्ये मेट्रो, मोनोसह अनेक विकास कामे सुरु आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. परंतु, पावसाळ्यात या सगळ्या खोदकामांमुळे त्या विभागांमध्ये पाणी साचण्याची मोठी शंका उद्भवू लागली आहे. पाणी तुंबल्याने पावसाळ्यात मुंबईकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीपासून त्यांची सुटका व्हावी, म्हणून मंबई महापालिकेने रस्ते विभागाला खड्डेमुक्तीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर महापालिकेने या खड्डेमुक्तीसाठी ३१ मेची डेडलाइन दिली आहे.

महापालिकेने खड्डेमुक्तीच्या धोरणासाठी सुमारे एक हजार १०६ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ५२२ रस्त्यांचे कामे पावसाळ्याअगोदर तर ५८४ रस्त्यांचे कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्या अगोदर दुरुस्त होणाऱ्या ५२२ रस्त्यांमध्ये ४६ मुख्य रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, पावसाळा सरु व्हायला अवघा एक महिना उरल्याने पालिकेने प्रशासनाला ३१ मेची डेडलाइन दिली आहे.

- Advertisement -

रस्त्यांची डागडुजी करुन मुंबई खड्डेमुक्त करावी, यासाठी महापालिकेने पावसाळ्या अगोदर व पावसाळ्यानंतर या दोन सत्रांमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाचे नियोजन केले आहे. यामध्ये अनुक्रमे ४६ आणि २७ अशा मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. वर्षाच्या सुरुवातीला आठशेहून अधिक रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली होती. यापैकी बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -