Video: मराठी कलाकारांनी मानले यांचे आभार; ‘तू चाल पुढं…’ तून व्यक्त केली कृतज्ञता!

सध्या अत्यावश्यक सेवेतून देशसेवा करणाऱ्यांना मराठी कलाकारांनी गाण्याच्या माध्यमातून धन्यवाद म्हटले आहे. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल करण्यात आले आहे.

मराठी कलाकार

देशात लॉकडाऊन सुरू असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना एक नागरिक म्हणून त्यांचे आभार व्यक्त करायलाही कोणी विसरत नाही. यामध्ये आता मराठी कलाकारही उतरले असून त्यांनी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या पोलीसदल, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते यांना धन्यवाद देणारे एक गाणं शूट केले आहे. मराठीतील तब्बल ३२ कलाकारांनी या गाण्यात सहभाग घेतला असून सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.

अशी पोस्ट केली शेअर 

तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत…
तू आहेस म्हणुन हा देश लढतोय…
तू आहेस म्हणुन माणुसपण जगतंय…
माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा…
तू चाल पुढं…
तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही…

या कलाकारांनी घेतला सहभाग 

अंकुश चौधरी, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, गष्मिर महाजनी, अमेय वाघ, आदिनाथ कोठारे, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, जयराज जोशी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, श्रेया बुगडे, मुक्ता बर्वे, स्वप्निल जोशी, ऋता दुर्गुळे, ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, अभिनय बेर्डे, क्षिती जोग, मृणमयी देशपांडे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, अनिता दाते, रिंकू राजगुरू, वैदेही परसुरामी, शिवानी सुर्वे, सायली संजीव, मिथिला पालकर

हेही वाचा –

चिंताजनक: बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना केलं क्वारंटाईन