घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी ३५ जण नाराज - नारायण राणे

शिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी ३५ जण नाराज – नारायण राणे

Subscribe

शिवसेनेमध्ये ५६ पैकी ३५ जण नाराज', असल्याचा खुलासा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

‘भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, कारण शिवसेनेच्या ५६ आमदारांपैकी ३५ जण नाराज आहेत’, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज ठाण्यातील वर्तक नगर येथे झालेल्या मालवणी महोत्सवात केला आहे. तसेच ‘या सरकारला कायमची सत्ता दिली नाही, आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ’, असा विश्वास देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

‘या सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा कॅबिनेटमध्ये केली होती. तसेच त्याचा जीआर काढला असला तरी देखील कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या तारखेचा उल्लेख नाही’, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे. त्याचबरोबर ‘कर्जमाफी कधी मिळेल हे सांगता येत नाही’, असे सांगत मनसे आणि भाजपबाबत मी काहीही बोलणार नाही ते पक्षाचे प्रमुख बोलतील, असेही ते पुढे म्हणाले. त्याचप्रमाणे ‘भाजप कोणाकडे गेले नव्हते, शिवसेना स्वतः आली होती. विशेष म्हणजे भाजप केंद्रात आहे आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार आहे. त्यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याचे गरज नाही. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेकडे ५४ पैकी ३५ जणांमध्ये नाराजी आहे’, असा धक्कादायक खुलासाही नारायण राणे यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

‘मी कोणावर नाराज नाही मला यांच्याकडे कोणतीही अपेक्षा नाही. तसेच या सरकारला राज्याचे प्रशासन माहिती नसून त्यासोबतच डेव्हलपमेंटबाबत देखील कोणतीही माहिती नाही, अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची? माझी ५० वर्ष राजकारणात झाली आहेत. या सरकारला सहा महिने मंत्रिमंडळ जाहीर करायला लागले’, असा आरोप ही नारायण राणे यांनी यावेळी केला.

आदित्य ठाकरेने शिकवायची गरज नाही

‘सीएए’बाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेने ट्विट केले होते त्याबाबत देखील राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. ‘आम्हाला शिकवायची गरज नाही, भाजपमध्ये शिकलेले लोक आहेत. त्यांना कायदा काय माहित नाही का? जी मंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी. आपल्याला काय कळते हे आधी बघावे. नंतर भाजपवर बोलावे.’, असा टोला देखील आदित्य ठाकरेंना नारायण राणेंनी लगावला आहे. शिवाय ‘ज्या औरंगाबादमध्ये ज्या बैठका घेतल्या योजना न देता ते बाहेर आले’, असा उल्लेख करत थेट उद्धव ठाकरेंवर नारायण राणे यांनी प्रहार केला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आधी अजित पवारांवर कारवाई करा’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -