आता पश्चिम रेल्वेच्या ३५४ स्थानकांवर ‘डिजिटल ट्राजेक्शनची सुविधा’

कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना काळात रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यातील एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने आपल्या ३५४ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल ट्राजक्शनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

354 Western railway stations will get digital transaction facility
आता पश्चिम रेल्वेच्या ३५४ स्थानकांवर 'डिजिटल ट्राजेक्शनची सुविधा'

कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना काळात रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यातील एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने आपल्या ३५४ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल ट्राजक्शनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तिकिट खिडक्या, खानपान युनिट आणि माल पार्सल काउंटरवर डिजिटल लेण-देण प्रक्रिया सुरु केली आहे.

कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन आणि गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अनेक खासगी कंपन्यांनी देखील डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले आहे. तसेच कोरोना काळात रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वेने प्रयत्न करत आहेत. आता टाळेबंदी काही अंशी शिथिल करण्यात आल्यावर रेल्वे सेवा पूर्ववत होत आहे. तसेच पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांची संख्या हळूहळू वाढते आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने आपल्या ३५४ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल ट्राजक्शनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याकरिता पश्चिम रेल्वेने आत्तापर्यत ९२८ पीओएस मशिन्स लावल्या आहेत. या मशिन्सच्या आधारे कार्ड पेमेंट करणे सोपे होते. याशिवाय यूपीआईआई आणि भीम अँपद्वारे युटीएस आणि पीआरएस काउंटरवर पेमेंट करण्याची सुविधा देखील आहे. मुंबईमध्ये सुरु करण्यात आलेली अनारक्षित तिकिट अँपची सुविधा आता संपूर्ण भारतीय रेल्वेत सुरु झालेली आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या ४ लाख ५ हजार प्रवासी डिजिटल पेमेंटचा वापर करतात. यामध्ये तिकिट विक्री सोबतच रेल्वेची पार्सल, खानपान विभाग, लिलाव विभाग, बील रिकव्हरीचा समावेश आहे. या सर्व डिजिटल पेमेंटमध्ये ई-बील जारी केले जाते. – सुमीत ठाकूर, मख्य जनसंपर्क अधिकार, पश्चिम रेल्वे


हेही वाचा – सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित होणार; सदस्यीय समितीची स्थापना