Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी दिलासादायक! कमी होणारी रुग्णसंख्या आजही कायम; २४ तासांत ३५६ नव्या रुग्णांची नोंद

356 new corona patient found and 5 death in 24 hours in mumbai
Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी दिलासादायक! कमी होणारी रुग्णसंख्या आजही कायम; २४ तासांत ३५६ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत अजूनही कमी होणारी नवी रुग्णसंख्या कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल, रविवारी मुंबईत ५३६ नवे कोरोनाबाधितांची आढळले होते. आज यामध्ये कमी होऊन गेल्या २४ तासांत मुंबईत ३५६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ९४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार १३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आज आढळलेल्या ३५६ नव्या कोरोनाबाधितांपैकी ३१३ रुग्ण एसिम्प्टोमॅटिक आहेत. तसेच आज दिवसभरात ४० रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ५१ हजार ७२९वर पोहोचली आहे. आतापर्यंत यापैकी १६ हजार ६६५ जणांचा मृत्यू झाला असून १० लाख २७ हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात १९ हजार ८६३ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ५५ लाख ७९ हजार २८१ चाचण्या झाल्या आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १ रुग्ण पुरुष आणि ४ रुग्ण महिल्या होत्या. ४ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित रुग्ण वय ४० ते ६० वयोगटातील होते. आता मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के झाला असून रुग्ण दुप्पटीचा दर ७६० दिवस आहे. सध्या मुंबईत १ सक्रिय सीलबंद इमारती आहे.


हेही वाचा – मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण; श्वसनासंबंधित आजार वाढले