घरताज्या घडामोडीवसई-विरारमध्ये दोन दिवसांत ३६० नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

वसई-विरारमध्ये दोन दिवसांत ३६० नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Subscribe

वसई-विरारमध्ये दोन दिवसांत ३६० नव्या रुग्णांची भर पडली असून तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दोन दिवसांत वसई तालुक्यात कोरोनाचे ३६० नवे रुग्ण आढळून आले. त्यातील ३५२ एकट्या वसई-विरार महापालिका हद्दीतील असून ग्रामीण भागात ८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. वसईत कोरोनाचे १३९, नालासोपार्‍यात १२२, विरारमध्ये ८० तर नायगावमध्ये ११ नवे रुग्ण आढळून आले. तर विरार शहरात कोरोनाने तिघांचा बळी घेतला. महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार ९६५ इतकी झाली असून १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. वसईच्या ग्रामीण भागात दिवसभरात कोरोनाचे ८ रुग्ण आढळले. सायवनमध्ये पाच, अर्नाळ्यात दोन आणि खोचिवड्यात एक रुग्ण आढळला. ग्रामीण परिसरात कोरोनाबाधितांची संख्या ३८२ इतकी झाली असून दहा जणांचे बळी गेले आहेत.

महापालिकेच्या कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू

मीरा-भाईंदर महापालिकेच्या नगररचना विभागातील संगणक चालक रुपेश दहिवळकर (४२) यांचे कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे सोमवारी निधन झाले. धक्कादायक बाब म्हणजे दहिवळकर यांच्या वडिलांचे दोनच दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. दहिवळकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. याआधी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी रामकृष्ण गावडे यांच्या कोरोनामुळे गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. महापालिकेतील उपायुक्तांसह अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेत घबराट पसरली आहे.

- Advertisement -

वसईतील पोलीस कर्मचार्‍याचे कोरोनामुळे निधन

वसईतील वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या जितेंद्र भालेराव (३८) यांचा कोरोनामुळे सोमवारी सकाळी नालासोपार्‍यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मूळचे मुरबाड येथील रहिवाशी असलेले भालेराव वालीव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. याआधी गेल्या ९ जूनला वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल किसन साळुंखे यांचे कोरोनाची लागण झाल्याने नालासोपार्‍यातीलच रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते.


हेही वाचा – मुंबईत आज कोरोनाचे १,१७४ नवे रुग्ण, तर ४७ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -