कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ०८ कोरोना बाधीत रूग्णं आढळून आले असून त्याापैकी ०२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. उर्वरीत सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यापैकी ०१ रूग्ण जसलोक हॉस्पीटलमध्ये तर उर्वरित सर्व रूग्णावर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली, महापालिका क्षेत्रात २८ मार्चला दोन नवीन रूग्णं आढळून आलेले असून, त्यांच्या ८ निकटवर्तीयांना कस्तुरबा येथे तपासणी करण्यात आली. त्यापैकी, ३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरीत ५ जणांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णांच्या परिसर लॉकडाऊन करण्यात आला असून प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.
सध्या् महापालिका क्षेत्रात ३८० होम क्वारंटाईन नागरीक असून महापालिकेमार्फत त्यांची दैनंदिन विचारपूस करण्यात येत आहे. तसेच, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम येथील एका रूग्णां चा अहवाल पॉझिटीव्ह आला असून या रूग्णालयाने खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असून अहवाल अद्याप अप्राप्त आहे. या रूग्णास मुंबई येथील खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले असून त्याचे निकटवर्तीयांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.