घरमुंबईएफसीएफएसच्या पहिल्या फेरीत 390 विद्यार्थ्यांचे प्रवेश

एफसीएफएसच्या पहिल्या फेरीत 390 विद्यार्थ्यांचे प्रवेश

Subscribe

सुधारित वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशाच्या ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) फेरीच्या पहिल्या प्रकारात मुंबई विभागातून 390 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे आता दुसर्‍या फेरीसाठी 1 लाख 33 हजार 79 जागा रिक्त राहिल्या आहेत. तीन फेर्‍या व विशेष फेरीनंतर मुंबई विभागातून जवळपास 25 हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. 24 ऑगस्टला दहिहंडी आल्याने एफसीएफएस फेरीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

एफसीएफएस फेरीमध्ये 80 टक्क्यांवरील म्हणजेच प्रकार एकसाठी 21 ऑगस्टला ज्या विद्यार्थ्यांनी ज्युनिअर कॉलेजची निवड केली होती. अशा विद्यार्थ्यांना 21 व 22 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जावून प्रवेश निश्चित करावयाचा होता. त्यानुसार पहिल्या प्रकारामधील 531 विद्यार्थ्यांनी कॉलेजांची निवड केली होती. त्यापैकी 390 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश निश्चित केला. एफसीएफएस (प्रकार – 2) फेरीसाठी जे विद्यार्थी 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेवून उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थी दिनांक 23 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेजांची निवड करता येणार आहे.

- Advertisement -

जुन्या वेळापत्रकानुसार 24 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचे होते. परंतु दहिहंडी आल्याने बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 26 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये प्रत्यक्षात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी 5 वाजता रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी रिक्त जागा

- Advertisement -

शाखा -रिक्त जागा
कला -14,586
वाणिज्य -46,734
विज्ञान -40,774
एम.सी.व्ही.सी. -2,572
एकूण -1,04,666

कोट्यासाठी रिक्त जागा
शाखा -रिक्त जागा

इन-हाऊस -5265
अल्पसंख्याक -14286
व्यवस्थापन -8322

एकूण 28,413

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -