घरमुंबईचव्हाण कुटुंबावर काळाचा घाला, रेल्वे अपघातात ४ भावांचा मृत्यू

चव्हाण कुटुंबावर काळाचा घाला, रेल्वे अपघातात ४ भावांचा मृत्यू

Subscribe

बोरीवली-कांदिवली दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात सोमवारी चार भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. बोरीवली ते कांदिवली रेल्वे स्टेशन दरम्यान या चारही जणांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळले. हे चारही भाऊ चव्हाण कुटुंबातील होते. हे चौघेही कणकवली येथून मुंबईला घरी परतत असताना त्यांच्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सागर संपत चव्हाण ( २३) साईप्रसाद मनोहर चव्हाण (१७), मनोज दिपक चव्हाण(१७), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण(२०) अशी या चारही भावांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?
कणकवलीहून आलेल्या चार भावांनी दादरहून कांदिवलीतील राहत्या घरी जाण्यासाठी सकाळी बोरीवली फास्ट लोकल पकडली. ट्रेन बोरीवलीला पोहोचणार तेवढ्यात पोईसर-कांदिवलीच्या दरम्यान लोकलला सिग्नल लागला. तेवढ्यात या चारही जणांनी ट्रेनमधून ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने या चौघांनाही उडवले, असे तिथे उपस्थित असेलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यानंतर त्यांना जवळच्या भगवती रुग्णालयात दाखल केले.पण, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. यातील सागर संपत चव्हाण हा मुलगा कांदिवलीचा रहिवासी होता. तर, इतर तीन भाऊ सुट्टी असल्याने त्याच्यासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते. या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -