घरमुंबईवरळीत ड्राईव्ह इन लसीकरणाचे आणखी ४ सेंटर सुरू करणार - महापौर

वरळीत ड्राईव्ह इन लसीकरणाचे आणखी ४ सेंटर सुरू करणार – महापौर

Subscribe

\

मुंबईत अनेक ठिकाणी ड्राईव्ह इन लसीकरण सुरू झाले असून त्यातील पहिला प्रयोग दादरमधील कोहिनूर येथे करण्यात आला होता. त्यानंतर आता वरळीच्या एनएससीआय पार्किंगमध्ये सुरू ड्राईव्ह इन लसीकरण आजपासून सुरू झाले आहे. वरळीच्या एनएससीआय पार्किंगमध्ये ड्राईव्ह इन लसीकरण मोहीमेत महापौर किशोरी पेडणेकर उपस्थितीत होत्या. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोनाची लस सहजतेने उपलब्ध व्हावी, म्हणून वरळीत ड्राईव्ह इन लसीकरणाचे आणखी ४ सेंटर सुरू करणार असल्याची माहिती दिली.

ड्राईव्ह इन लसीकरणात नागरिकांचे समाधान

यासोबतच, आतापर्यंत संपूर्ण लसीकरण कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींचं नागरिकांना करण्यात आलं आहे. या लसीकरणाची एकूण सरासरी पाहिलं तर २५ लाख ५ हजार ७६१ कोव्हिशील्ड लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे. १ लाख ७५ हजार ३९ इतक्या लोकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस नागरिकांना देण्यात आला आहे. यासह co-win अॅपवर ज्यांनी कोरोना लसीसाठी नोंदणी केली आहे, असे नागरिक वरळीतील ड्राईव्ह इन लसीकरण मोहीमेत सहभागी झाले असून त्यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

- Advertisement -

मुंबईतील वरळीच्या एनएससीआय पार्किंगमध्ये आजपासून सुरूवात झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तेथे उद्घाटन करण्यात आलं आहे. वरळीच्या एनएससीआय पार्किंगमध्ये सुरू झालेल्या लसीकरणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला तर मुंबईच्या माहापौर किशोरी पेडणेकर, अरविंद सावंत हे या कार्यक्रमाला हजर होते.

पालिकेच्या प्रत्येक विभागात ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र

दादरच्या कोहिनूर येथे पहिले ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. याला प्रतिसाद मिळत असून यामुळे गर्दीचे नियंत्रण केले जात असल्याने करोना प्रतिबंधात्मक उपायांचेही पालन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अशाप्रकारचे ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र २४ तास कार्यन्वित करण्याचे दिले आहेत. त्यानुसार, मुंबईतील प्रत्येक विभागांमध्ये २४ तासांत सुरू करावीत, अशी सूचना नुकतीच पालिकेने दिली आहे. त्यामुळे लवकरच सहा ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. दरम्यान, अंधेरीतील क्रीडा संकुल, कुपरेज मैदान, शिवाजी स्टेडिअम, ओव्हल मैदान, एमआयजी, एमसीए मैदान, रिलायन्य जिओ उद्यान, मुलुंडचे शिवाजी उद्यान, चेंबूर सुभाष नगर आणि टिळक नगर मैदान, घाटकोपर पोलिस मैदान, चुनाभट्टी शिवाजी मैदान अशा मुंबईतील मोठ्या मैदानाचा यासाठी वापर करता येईल असेही पालिकेने सूचित केले आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -