घरमुंबईसाकीनाका गॅस सिलिंडर दुर्घटनेतील मृतांची संख्या 'चार'वर

साकीनाका गॅस सिलिंडर दुर्घटनेतील मृतांची संख्या ‘चार’वर

Subscribe

साकीनाका येथील आनंद भुवन येथे असलेल्या चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

साकीनाका येथे मंगळवारी (काल) रात्री एका चाळीतील घरात झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. या स्फोटात अलमस (वय १५) या मुलीचा मृत्यू झाला होता आणि आणखी ५ जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना सायन रुग्णालयात आणि तिघांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सायन रुग्णालयात अस्मा (वय ६०) या महिलेचा, तर रिहान (वय ८) या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सानिया (१४) ही मुलगी आज (२६ नोव्हेंबर) कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत पावली आहे. त्यामुळे साकीनाका गॅस सिलिंडर दुर्घटनेतील मृतांची संख्या ४ झाली आहे. सकाळी ८.१५ वाजता तिचा मृत्यू झाला आहे.

साकीनाका येथील आनंद भुवन येथे असलेल्या चाळीतील एका घरात मंगळवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला होता. या स्फोटात अलमस नामक मुलीचा मृत्यू झाला होता. तर अनिस खान, अस्मा, शिफा, सानिया आणि रिहान या पाच जणांना प्रारंभी राजावाडी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. रिहान आणि अस्मा यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना या दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित ३ गंभीर जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -