घरCORONA UPDATEमहापालिकेच्या वरळीतील गॅरेजमधील ४ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा

महापालिकेच्या वरळीतील गॅरेजमधील ४ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा

Subscribe

मुंबईतील सर्वात मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या वरळीतील गॅरेजमधील ४ सुरक्षा रक्षकांनाही याची बाधा झाल्याचे समोर आले.

नायर रुग्णालयातील आठ आणि कस्तुरबा रुग्णालयातील एका महापालिका सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील सर्वात मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या वरळीतील गॅरेजमधील ४ सुरक्षा रक्षकांनाही याची बाधा झाल्याचे समोर आले. यातील एका महिला सुरक्षा रक्षकावर वरळीतील एनएससीआयच्या केंद्रात तर उर्वरीत तिघांना अंबरनाथ, कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, नायर रुग्णालयातून आणखी चार सुरक्षा रक्षक बरे होवून घरी परतले आहेत.

मुंबईतील अनेक भागांमध्ये रुग्णवाहिकांची सेवा ज्या वरळीत गॅरेजधून दिल्या जातात, त्या गॅरेजमध्ये मागील काही दिवसांपासून चालक व अन्य तांत्रिक कामगारांना कोरोनाची बाधा झालेली आहे. मात्र, आता येथील सुरक्षा रक्षकांनाही याची बाधा झाल्याची बाब समोर आली. सुरक्षा चौकी इतर कामगार पिण्याचे पाणी भरण्यास येत असल्याने त्यामुळे या सुरक्षा रक्षकांना याची बाधा झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मुंबईतील नायर रुग्णालयातील एका महिलेसह सहा सुरक्षा रक्षक तसे महाराष्ट्र सुरक्षा दलाचा एक जवान आदी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर त्याच दिवशी कस्तुरबा रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाचाही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे नायरमध्ये आठ तर कस्तुरबा एक याप्रमाणे ९ सुरक्षा रक्षकांवर कोरोनाचे उपचार सुरु होते. परंतु नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी शनिवारी दोन जवानांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर रविवारी उशिरात आणखी चार सुरक्षा रक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी पाठवून १४ दिवस घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती  महापालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर यांनी दिली आहे. तसेच वरळी गॅरेजमधील ४ सुरक्षा रक्षकांनाही बाधा झाली असून त्यातील एकावर वरळीतील केंद्रात आणि उर्वरीत तिघांवर कल्याण, अंबरनाथ येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -