घरमुंबईथंडीच्या अभूतपूर्व लाटेमुळे ४०० नौका समुद्रातून किनार्‍यावर मासळीचा गारठा दुष्काळ

थंडीच्या अभूतपूर्व लाटेमुळे ४०० नौका समुद्रातून किनार्‍यावर मासळीचा गारठा दुष्काळ

Subscribe

बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे आणि अवकाळी वादळी पावसाने समुद्र किनारपट्टीवर प्रचंड गारठा पडला आहे. रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थंडीचा पारा १५ ते १० सेल्सिअस इतका खाली येत असून मानवी प्रकृतीस सहन करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. अतिगारठ्यामुळे समुद्रातील मासळी खोल समुद्रात गेल्याने मच्छिमारांना मासे मिळणे दुरापास्त झाले आहे.

वाढत्या गारठ्यामुळे रक्त गोठून स्ट्रोक, हार्ट अटॅक, बीपी वाढणे किंवा कमी होणे, पक्षघात, मानसिक संतुलन बिघडणे अथवा अन्य कोणताही आजार अचानक निर्माण होऊन प्रकृती बिघडू शकते. यासाठी सायंकाळी शक्यतो बाहेर पडू नये किंवा उबदार कपडे घालूनच थंडीपासून बचाव करावा, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. या अतिथंडीचा परिणाम समुद्रातील मासळीवर देखील झाला आहे.

- Advertisement -

समुद्रातील मासळी ठराविक तापमानापर्यंत टिकून राहते. हे तापमान कमी वा अधिक समुद्रातील मासळी संतुलनातील परिसरात झाले. हे संतुलन सध्या अरबी समुद्रात गारठ्यामुळे लोप पावल्याने मासळी मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. यामुळे समुद्रात गेलेल्या अलिबाग तालुक्यासहित मुरूड, एकदरा, राजपुरी, दिघी, नांदगाव या गावच्या सुमारे ४०० मासेमारी नौका किनार्‍यावर परतल्या आहेत.

किनार्‍यावरील थंडीमुळे डोलीची मासळीही मिळेनासी झाली आहे. यामुळे लहान मच्छिमारांचीही उपासमार सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून ही परिस्थिती ओढावली आहे. एकदरा गावचे नौका मालक कैलास निशानदार, यांनी सांगितले की, समुद्रावरून अति थंड वारे वाहत असल्याने पाण्याला देखील गारवा आला आहे. त्यामुळे मासळी खोल पाण्यात समुद्र तळाला गेली आहे.

- Advertisement -

समुद्रात पाण्याला अति थंडावा येतो त्यावेळेस मासळी किनार्‍यापासून खूप खोल समुद्रात ऊब मिळविण्यासाठी जात असते. अशा वेळी मासळीचा प्रवास ५० किंवा १०० वाव असू शकतो. पाकिस्तान बॉर्डरपर्यंत मोठी मासळी स्थलांतर करू शकते. त्यामुळे मासळी मिळणे अवघड असते. – मनोहर बैल, अध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छिमार कृती संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -