घरताज्या घडामोडीकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच; ४२१ नवे रुग्ण, तर २७२ मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच; ४२१ नवे रुग्ण, तर २७२ मृत्यू

Subscribe

कल्याण-डोंबिवलीत ४२१ जणांची नोंद झाली असून २७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून मंगळवारी २६८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर आज त्याच्या दुप्पट कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज कल्याण-डोंबिवलीत ४२१ जणांची नोंद झाली असून २७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

१० हजार ८५७ जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १० हजार ८५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

असे आढळले नवे रुग्ण

कल्याण (पू) : ७८
कल्याण (प): ११९
डोंबिवली (पू) : १३६
डोंबिवली (प) : ५८
मांडा-टिटवाळा : १२
मोहना : १४
पिसवली : ०४

- Advertisement -

हेही वाचा – Corona : औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४२८ रुग्णांची नोंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -