घरताज्या घडामोडीकल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान; ४२७ नवे रुग्ण, तर २५५ मृत्यू

कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान; ४२७ नवे रुग्ण, तर २५५ मृत्यू

Subscribe

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ४२७ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ४२७ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

१० हजार ४७ जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १० हजार ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ६ हजार ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

असे आढळले नवे रुग्ण

  • कल्याण (पू) : ९१
  • कल्याण (प): ११६
  • डोंबिवली (पू) : १२२
  • डोंबिवली (प) : ६२
  • मांडा-टिटवाळा : २०
  • मोहना : १२
  • पिसवली : ०४

    देशात २४ तासांत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ

    भारतात गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात काल दिवसभरात ४० हजार ४२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या विक्रमी वाढीनंतर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार ४५९ सक्रिय रुग्ण आहेत. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

    - Advertisement -

    हेही वाचा – LockDown : गेल्या चार महिन्यात रायगड जिल्ह्यात ६५ जणांच्या आत्महत्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -