घरCORONA UPDATECorona: मालाडमधील ४५ संशयित कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता

Corona: मालाडमधील ४५ संशयित कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता

Subscribe

मुंबईतील काही रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्ण पळून जाण्याच्या घटना घडलेल्या असतानाच काही विभगांमध्ये तर कोरोना चाचणी करणारे रुग्णच महापालिकेच्या रेंजमध्ये आलेले नाही. मालाडच्या पी-उत्तर विभागातच अशाप्रकारे कोरोना चाचणी केलेले ४५ रुग्णांचा अद्यापही ठाव ठिकाणा लागलेला नसून अशाप्रकारे महापालिकेच्या २४ विभागांमध्ये शेकडो रुग्णांचा पत्ताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लागलेला आहे. मात्र,मालाडमधील घटना समोर येताच आता पोलिसांच्या मदतीने यासर्वांचे ट्रेसिंग करून शोध घेण्याचे फर्मान महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबईतील मालाड येथील पी-उत्तर विभागांमध्ये सध्या ३८०३ कोरेाना बाधित रुग्ण आढळून आले आहे. परंतु महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मालाडच्या विभागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा घेतला. त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी काही कोरोना चाचणी केलेल्या काही रुग्णांचा अद्याप शोध लागत नसल्याची बाबत त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तीन दिवसांपूर्वी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी ज्या रुग्णांनी तपासणी केली होती आणि ज्यांचे फोन नॉट रिचेबल तसेच घरचा पत्ता सापडत नसल्याने त्यांची यादी नगरसेवकांच्या ग्रुपवर पाठवत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सोमवारी आयुक्तांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा आल्यानंतर, आयुक्तांनी यासाठी पोलिसांची मदत घेवून या संशयित रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

- Advertisement -

पी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोरेाना चाचणी केलेल्या रुग्णांचे मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता तसेच आधार कार्ड क्रमांक संबंधित प्रयोगशाळेतून महापालिका कार्यालयात सादर केला जातो. त्यामुळे सुरुवातीपासून काही रुग्णांचे फोन बंद आहेत तर काहींची घर बंद आहे,असे प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या ४५ रुग्णांचा शोध लागत नाही. त्यामुळे पोलिसांना ही यादी सादर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या मर्कजला गेलेल्या लोकांचे लोकेशन ट्रेस करत त्यांचा शोध घेतला होता, त्याच धर्तीवर यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु यामध्ये बऱ्याचदा मोबाईल क्रमांक चुकीचा नोंदवून घेतल्यामुळेही संपर्क होत नसेल किंवा काही रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असतील. विशेष म्हणजे ज्या रुग्णाचा फोन यापूर्वी लागत नव्हता. त्या रुग्णाचा शोध लागला होता आणि ते रुग्णालयात होते तेव्हा त्यांचा फोन बंद होता. म्हणून संपर्क होवू शकला नव्हता,असे सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्व विभाग कार्यालयात प्रयोग शाळेतून प्राप्त होणाऱ्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे रुग्णांशी संपर्क साधला जातो. त्यानुसार रुग्णांची यादी बनवली जाते. त्यामुळे मालाड प्रमाणे महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्येही असेच प्रकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही विभागांच्या अधिकाऱ्यांनी तर काही रुग्णांचे शोध अद्याप होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रयोग शाळेत कोरोना चाचणी केल्यानंतर अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात थेट दाखल झाले किंवा गावी निघून गेले असतील. महापालिकेकडून संपर्क होईल या भीतीने काहींनी फोन बंद करून ठेवल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक विभाग कार्यालयांमध्ये अशाप्रकारे मिसिंग असलेल्या रुग्णांचे लोकेशन आता पोलिसांच्या माध्यमातून ट्रेस करण्याची आवश्यकता भासणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

व्हिडिओकॉनच्या वेणुगोपाल धूतविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -