घरमुंबईगोकुळमध्ये विरोधी आघाडीची डोकेदुखी वाढली!

गोकुळमध्ये विरोधी आघाडीची डोकेदुखी वाढली!

Subscribe

आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांवर दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ४८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे. गोकुळच्या इतिहासात प्रथच एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. दोन्ही आघाडीकडून तोडीसतोड उमेदवार दिले असले तरी यापैकी काहींचाच पॅनेलमध्ये समावेश होणार असल्याने मोठ्या आर्थिक घडामोडी घडणार आहेत. गोकुळच्या निवडणुकीत टोकाची ईर्षा निर्माण झाल्याने प्रत्येक उमेदवाराकडे असलेल्या ठरावांची संख्याही लक्षात घेतली जाणार आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांवर दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे.

उमेदवारी द्या, अन्यथा आम्हाला पर्याय खूला असल्याचा इशाराही काही इच्छुकांनी गोकुळचे शाहू आघाडीचे नेते मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना दिला आहे. परिणामी, पाटील-मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीची कसोटी ठरणार आहे. आघाडीच्या नेत्यांच्या डोकेदुखीत यामुळे चांगलीच वाढ झालीय.

- Advertisement -

संचालकपदासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याने अनेकांना कसरत करावी लागणार आहे. यासाठी कितीचीही बोली बोलण्याची तयारीही अनेक इच्छुकांनी केल्याचे समजते. आमदार राजेश पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर व अरुण डोंगळे यांची उमेदवारी निश्चित असल्याने आता नाराजांची फौज उभी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -